महाराष्ट्र वेदभुमी

नाशिक पत्रकारांवरील हल्ल्याचा नवीमुंबई वाशी येथे जाहीर निषेध व्यक्त आला !

जखमींची मंत्री छगन भुजबळ यांनी भेट घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली ! 

सर्व प्रसार माध्यमातून विडिओ व्हायरल! 

मुंबई प्रतिनिधी :(सतिश पाटील)

(नाशिक त्र्यंबकेश्वर) पत्रकारांवर पार्किंग वाद भ्याड हल्ला झी टिव्हीचे चिफ: योगेश खरे,साम टिव्हीचे चिफ :अभिजीत सोनावणे,पुढारी न्युज चे चिफ:  किरण ताजने या तिघा पत्रकारावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंग वर काम करणारे गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी अमानुष जीवे मारण्यात प्रयत्न केला या हल्ल्याचा सर्व पत्रकार संघटनांकडून, न्युज चॅनेल तसेच जनतेकडून जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे , लवकरात लवकर या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात मागणी, मुखमंत्री, उपमुख्य मंत्री,गृहमंत्रालय याच्या कडे करण्यात आली आहे...

पत्रकार हल्ल्यात जखमी हाॅस्पिटलमध्ये दाखल करुन उपचार घेत आहेत! कधी असे हल्ले थांबणार?

मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर भागांत पत्रकारांवर शासकीय अधिकारी, राजकीय नेते तसेच सामाजिक आंदोलनकर्त्यांकडून होणारे गैरवर्तन आणि शारीरिक हल्ले थांबवण्यासाठी नवी मुंबईतील पत्रकारांनी जोरदार निषेध आंदोलन केले. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित झालेल्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियातील पत्रकार, फोटो जर्नालिस्ट, व्हिडिओ जर्नालिस्ट आणि संपादकांनी या घटनांचा तीव्र निषेध नोंदवला. आंदोलनात सहभागी झालेल्या पत्रकारांनी घोषणाबाजी करत पत्रकारांच्या हक्कांसाठी एकजुटीने आवाज बुलंद केला आहे. या आंदोलनात पत्रकार सर्वस्वी विश्वरथ नायर, सुदिप घोलप, अनंत मिस्त्री, नागमनी पांडे, राजेंद्र बोडके, सुनील तावडे, विठ्ठल दळवी, दिपक सोनवणे, सनी मेहरोल, पुरषोत्तम कनोजीया, कासीम सय्यद, फोरम जोशी, सुमित रेनोसे, साईनाथ भोईर, अथर्व रणदिवे, समीर शेख, प्रकाश शिंदे, दीपक कांबळे, फारुख सय्यद, भरतकुमार कांबळे व इतर पत्रकार उपस्थित होते. या आंदोलनाचे नेतृत्व नवी मुंबईतील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियातील पत्रकार आणि पत्रकार संघटना यांनी केले...

पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत. त्यांच्यावर होणारे हल्ले हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे. मुंबई, पुणे येथे अलीकडेच घडलेल्या घटा अस्वीकारार्ह आहेत. आम्ही याचा तीव्र निषेध करतो आणि सरकारकडून तात्काळ कारवाईची मागणी करतो असे मत मांडण्यात आले. तर, ‌‘पत्रकारांवर हल्ला बंद करा’, ‌‘प्रशासनातील पत्रकार विरोधी मानसिकता बाळगणाऱ्या अधिकाऱ्यांना निषेध असो’ अशा घोषणाबाजी करण्यात आल्या...

यावेळी आंदोलकांनी सरकारला इशारा दिला की, जर पत्रकार सुरक्षेसाठीचे कठोर कायदे पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आणले गेले नाहीत, तर यापुढेही मोठे आंदोलने होणार, आंदोलनाने पत्रकार बांधवांमध्ये एकजूट दिसून आली आणि स्थानिक राजकीय नेत्यांकडूनही या मागण्या मान्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तर आंदोलनात सहभागी झालेल्या विविध पत्रकार संघटनांच्या सदस्यांनी सांगितले की, हे आंदोलन राज्यभरातील पत्रकारांसाठी एक संदेश आहे आणि यापुढेही हक्कांसाठी लढा सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले...

संघटनेकडून खंत व्यक्त

पत्रकारीतेला देशातील लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. पत्रकार नेहमीच समाजामधील चुकीच्या गोष्टी लोकांपुढे आणतो. लोकांचे प्रश्न सोडवण्यात मदत करतो. प्रशासनाकडे प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून मांडतो. परंतु, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या पत्रकारावर अनेक हल्ले देखील होतात. मात्र, ज्या प्रमाणात पत्रकारांना संरक्षण दिले पाहिजे त्या प्रमाणात या कायद्याच्या माध्यमातून संरक्षण मिळत नाही, अशी खंत काही पत्रकार संघटनांकडून व्यक्त करण्यात येते..

Post a Comment

Previous Post Next Post