महाराष्ट्र वेदभुमी

बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सो.लि.कुलाबा,मुंबईच्या मानद सचिव पदी कामगार नेते संजय आम्रे यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर

दि.१७/०९/२०२५

मुंबईची रक्तवाहिनी समजली जाणारी बेस्ट बसच्या कामगार पतपेढीची निवडणूक १८/०८/२०२५ रोजी पार पडली सदर निवडणूकीत सर्व राजकीय पक्षांच्या संघटनांनी भाग घेतला होता...१५ हजार सभासदान मधुन २१ संचालक निवडणूक द्यायचे होते त्यापैकी १४ संचालक बेस्ट वर्कर्स युनियन च्या'शशांक राव' पॅनेलचे निवडुन येऊन दणदणीत विजय मिळवला...

दि.१७/०९/२०२५ रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालय कुलाबा,मुंबई येथे संचालकांची बैठक पार पडली त्या बैठकीत संस्थेच्या मानद सचिव पदी बेस्ट वर्कर्स युनियन चे धडाडीचे कार्यकर्ते, बेस्ट कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढणारे लढाऊ नेते संजय आम्रे यांची बिनविरोध निवड झाली असून त्याच्या निवडीने बेस्ट वर्कर्स युनियन च्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांन मधे नवचैतन्य निर्माण झाले असून सर्व आगार, कामगार सभासदांकडुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post