कोलाड (श्याम लोखंडे): केंद्र शासनाने व राज्य सरकारने शेतकऱ्यांवर वने पर्यावरणीय संवेदनशिल क्षेत्र लादले जात असलेले निर्बंध रद्द करावेत व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी चिल्हे देवकान्हे विभागातील शेतकरी तसेच संघटनांनी सदरील तहसीलदार, प्रांत, वन विभाग जिल्हाधिकारी, त्याच बरोबर स्थानिक लोकसभा खासदार, राज्यसभा खासदार, मंत्री महोदय, स्थानिक आमदार यांना याला विरोध करत हरकतीबाबचे निवेदन दिले गेले आहेत.या संदर्भात तलाठी सजा चिल्हे अंतर्गत शेतकऱ्यांची आढावा बैठक चिल्हे येथे पार पडली याला येथील प्रमुख शेकऱ्यांचा उत्सपूर्त प्रतिसाद लाभला...
रविवारी 14 सप्टेंबर रोजी सायं.6 वा. विभागातील चिल्हे येथे केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व वातावरण बंदल मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी क्र. S.O.3060 (E) दि. 31/07/2024 अन्वये जारी केलेली मसुदा अधिसुचना तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांच्याकडिल पत्र क्र. म.रा.जै.वि.मं/कक्ष-5/WGESA/390/2024-25 दि. 12/08/2024.निवासी उपजिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्याकडिल पत्र क्र. मशा/जमीन/अ-3/WGESA/31 जुलै 24 ची अधिसुचना/2024, दि. 17/10/2024.जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडिल पत्र जा. क्र. मशा/अ 3/WGESA/अधिसुचना दि. 20/12/2024.या कार्यालयाचे पत्र क्र. ब/11/मोजणी/3734, दि. 21/12/2024. जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडिल पत्र जा. क्र. मशा/अ 3/WGESA/अधिसुचना दि. 10/06/2025.केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषीत करण्यासाठी क्र. S.O.3060 (E) दि. 31/07/2024 अन्वये प्रारुप अधिसुचना प्रसिध्द केलेली असून सदर प्रारुप अधिसुचनेची प्रत यापुर्वी आपणास उपलब्ध करून दिलेली आहे. तर वनक्षेत्रपाल रोहा, माणगांव व महाड यांनी सदर प्रारुप अधिसुचनेतील नमुद गावांबाबत व सदर अधिसुचनेबाबत काही हरकती अगर आक्षेप असल्यास त्याबाबतची माहिती अभिप्रायासह तात्काळ या कार्यालयास सादर करावी. जेणेकरून सदरची माहिती वरिष्ठ कार्यालयास मुदतीत सादर करणे शक्य होईल.या अनुषंगाने रोहा तालुक्यातील तलाठी सजा चिल्हे हद्दीतील देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे, तळवली तर्फे अष्टमी या विभागीय शेतकऱ्यांनी यावर हरकती नोंदवित शासनाने ठराविक जारी केलेल्या दिवसांपूर्वीच सर्वत्र हरकती घेत पत्र व्यवहार तसेच निवेदन प्रशासनाला सादर केले असून यावर पुन्हा एकदा सारे शेतकरी एकत्रपणे येऊन या सभेचे आयोजन करण्यात आले होते...
यावेळी तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायतीचे माजी सरपंच तथा प्रगतशील शेतकरी धनाजी लोखंडे, वसंतराव मरवडे,विद्यमान सरपंच रविंद्र मरवडे, माजी उपसरपंच संदीप महाडिक,शेतकरी राम महाडिक, किशोर भोईर, संतोष भोईर,पांडुरंग गोसावी,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सखाराम कचरे,सुरेश महाडिक, रमेश महाडिक,राम लोखंडे,सुनिल महाडिक, चिल्हे पोलिस पाटील गणेश महाडिक, देवकान्हे पोलिस पाटील दयाराम भोईर, पत्रकार डॉ. श्यामभाऊ लोखंडे,संदीप लोखंडे, किशोर महाडिक, सह विभागीय शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी व आदी विभागातील शेतकरी तसेच चिल्हे गावातील शेतकरी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते...
रोहा तालुक्यातील तब्बल 119 गावांना वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात येत असून याला सर्वत्र तीव्र विरोध होत आहे तर सदरच्या बैठकीत सरकारकडून शेतकऱ्यांच्या विरोधातील नव नवीन येणारे धोरण याला तीव्र विरोध करण्यासाठी तसेच बळीराजाला जागे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.या प्रसंगी येथील उपस्थित ग्रामस्थ शेतकरी यांनी सांगितले की केंद्र सरकार कडून लागू करण्यात येणारे इको सिन्स्विटी झोनवर येथील बळीराजा शेतकरी यांची हरकत आहे तसेच ते लादू नये त्याचबरोबर ते रद्द करण्यात यावे तसेच आता आणखी काही वन आणि फॉरेस्ट संदर्भात नवे जीआर काढण्याचा घाट सरकारच्या वतीने होत आहे यासाठी आपण सर्वजण एकत्रित संघटित झाले पाहिजे अशी तसेच सर्वांनी एकजुटीने सऱ्या संकटाला सामोरे गेलो तरच न्याय मिळेल असे उपस्थित प्रमुख प्रगतशील शेतकऱ्यांनी मार्गदर्शन केले.
