महाराष्ट्र वेदभुमी

कोलमांडले पाटील मंडळी दहीहंडीचा उत्सव

 


श्रीवर्धन प्रतिनिधी: श्रीवर्धन तालुका कोलमांडले पाटील मंडळी दहीहंडीचा उत्सव दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो...उत्सव काय आहे हे गावी गेल्याशिवाय कळत नाही हे खरे आहे... जग कितीही वेगाने बदलत असलं तरी आपली ही परंपरा, संस्कृती अबाधित आहे, अखंड आहे याचा आजही तितकाच अभिमान आहे...

त्याचप्रमाणे याही वर्षी रात्री लहान थोर मंडळी, महिला यांच्या सर्वांच्या उपस्थित श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली... त्यानंतर दुसर्‍या दिवशी गोपाळकाला प्रथम देवळात जावून मानाची हंडी फोडून सुरुवात केली... प्रत्येक घराजवळ जावून या गोविंदांसोबत पारंपारिक गाण्यांवर सनई आणि ढोलांचा ठेका धरत त्याच बरोबर वरुण राजाने सुध्दा हजेरी लावून छान प्रतिसाद दिला रिमझिम पावसाबरोबर सर्व लहान आणि मोठे गोविंदा नाचत गाजत उत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला....

खूपच छान आयोजन आणि नियोजन, त्यामुळे मनसोक्त आनंद घेता आला...  तसेच सगळ्यांचे  लाडके हाकेला साथ देणारे प्रशांतजी शिंदे साहेब यांच्या सौजन्याने सर्व बाळ गोविंदांना टीशर्ट देण्यात आले... शिवाय सर्व कमिटी आणि सदस्य यांचे तसेच गावचे पाटील दीपेश पाटील यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले...

Post a Comment

Previous Post Next Post