मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील :- -- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले.
कोलाड (श्याम लोखंडे) महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाची २० फेब्रुवारी २०२५ रोजी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेत महामार्गावरील प्रत्यक्ष सुरु असलेली कामे, तसेच रखडलेली कामे.त्यामध्ये होत असलेली दिरंगाई,जमीन हस्तांतरणात येत असलेल्या अडचणी तसेच अन्य सर्व समस्यांचे थेट पाहणी दौऱ्यातून तसेच तेथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करून त्यावर उपाय योजना यांचा आढावा घेतला.त्यात किती कामे केली आणि अद्याप किती दिरंगाईत आहेत याची तद्नंतर पुन्हा गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी पाहणी दौरा पळस्पे ते इंदापूर दरम्यांतील सुकेळी खिंड,खांब,कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाण पूल,गटारे त्याच बरोबर भिरा फाटा, तिसे तळवली येथील पाहणी केली.महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी या निमित्ताने कोलाड नाक्यावर स्वागत केले.यावेळी पेण चे आमदार रवीशेठ पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील,भाजप रोहा तालुका अध्यक्ष महेश ठाकूर, शिंदेगट शिवशेना उपतालुका प्रमुख चंद्रकांत जाधव, राष्ट्रवादी युवा नेते राकेश शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच सदरील खात्याचे अधिकारी देखील या प्रसंगी उपस्थित होत...
२० फेब्रुवारी २०२५ रोजी या मार्गावरील रखडलेल्या कामाची पाहणी केल्यानंतर कामाला गती नक्की मिळाली होती त्यात केवळ कोलाड पूई येथील महिसदरा पूल याचे काम प्रगती पथावर झाले तर काही ठिकाणी पुन्हा त्यात दिरंगाई आली असल्याने खांब सर्व्हिस रोड गटारे, कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाण पूल आणि गटारे तिसे तळवली येथील कामात अद्याप दिरंगाईच त्यामुळे पुन्हा मार्गावरील तसेच मार्गालगत असलेली गावे व येथील ग्रामस्थांच्या समस्या त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे अन्याय न करता सर्व संबंधित यंत्रणानी महामार्गचे काम कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपुल, सर्व्हिस रोड, गटारे, भिरा फाटा, तसेच तिसे तळवली येथील रखडलेल्या पादचारी पूल आणि गावाला जोडला गेलेला रस्ता आणि गटार लाईन या कामात कोणतीही हयगय करू नका ग्रामस्थाना विश्वासात घेऊन येथील कामे लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना मंत्री भोसले यांनी पुन्हा कोलाड आंबेवाडी तिसे तळवली येथील ग्रामस्थांसमवेत त्यांना दिलासा देत यावेळी दिल्या..
तर सदरच्या मुंबई गोवा महामार्गावरील पाहणी दौऱ्यात सार्व.बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दरम्यानच्या पलस्पे ते इंदापूर दरम्यातील दौऱ्यात नागोठणे,तसेच गेली अनेक वर्षे मोठी समस्या निर्माण होत कोलाड आंबेवाडी नाका, येथील उड्डाण पूल, सर्व्हिस रोड गटारे तसेच पावसाळी निर्माण झालेली पूर परिस्थिती,भिरा फाटा,त्याच बरोबर गेली अनेक वर्षे रखडलेल्या तिसे तळवली येथील पादचारी पूल सर्व्हिस रोड गटारे आणि गावाला जोडला गेलेला रस्ता, गटारे, तसेच मागच्या ठेकेदार यांनी बेधुंदपणे विविध प्रकारचे ब्रेकर मशीन काम करत असताना घरला गेलेले तडे गेले.याबाबत देखील खासदार सुनील तटकरे,धैर्यशील पाटील,माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्याशी ग्रामस्थांनी समस्या मांडल्या यावर यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता २० फेब्रुवारी रोजी दौऱ्याच्या दरम्यान मंत्री भोसले यांनी येथील येथील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन येथील कामे पूर्ण करा असे निर्देश दिले मात्र तसे न करता त्यावर सदरील ठेकेदार यांनी केराची टोपली दाखवून हुकूमत गिरीने पोलिसांचा फौज फाटा घेत काम सुरू केले मात्र ते देखील अर्धवट असल्याने पुन्हा येथील ग्रामस्थानी मंत्री भोसले यांचे गाव दरबारी स्वागत करत सदरील ठेकेदार याच्या बाबत संताप व्यक्त करत व्यथा मांडली.तर त्यांना येणाऱ्या समस्या पुन्हा जाणून घेतल्या. या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपारी सहाय्य करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी पुन्हा येथील ग्रामस्थांना सांगत मंत्री भोसले यांनी मोठा दिलासा देत पुढील इंदापूर,माणगाव, लोनेरे, महाडकडे प्रस्थान केले...
प्रतिक्रीया
येथील रखडलेल्या कामाबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारी या मागणीला तसेच अर्धवट कामांची राज्याचे सार्व.बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या पाहणी दौऱ्यावर असताना आम्ही ग्रामस्थानी येथे पुन्हा भेट घेतली येथील रखडलेल्या कामाची पाहणी करून आम्हा ग्रामस्थाना दिलासा दिला आहे. या आधी खासदार सुनील तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, मंत्री अदिती तटकरे,युवा नेते माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी पाहणी केली होती तसेच खासदार धैर्यशीलदादा पाटील यांनी देखील या बाबीचा पाठपुरावा केला होता.येथे बांधण्यात आलेला पादचारी उड्डाण पूल, त्याला जोडण्यात आलेला रस्ता, सर्व्हिस रोड, गटारे, या कामात असंख्ये त्रुटी त्यावर संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करत मनमानी पद्धतीने काम करत असताना कोणत्याही प्रकारे ग्रामस्थाना विश्वासात न घेता ठेकेदार पुन्हा काम करत आहेत.तर तुम्ही मागील फेब्रुवारी महिन्यात पाहणी केली त्यात ठेकेदार यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पुढील कामे करावी असे निर्देश दिले होते मात्र त्यांनी त्यांनी त्या निर्देशाला न जुमानता पोलिस यंत्रणा उभी करून कामास प्रयत्न केला मात्र ते देखील फेल ठरले त्यामुळे या अर्धवट कामांमुळे अनेक अपघात या ठिकाणी घडले असल्याच्या तक्रारी तथा गाऱ्हाणे पुन्हा ग्रामस्थानी मंत्री भोसले यांच्या पाहणी दौऱ्यात मांडल्या आणि त्याला पुन्हा आम्हा ग्रामस्थांना पुन्हा दिलासा देत सदरील अधिकारी आणि ठेकेदार यांना येथील ग्रामस्थांच्या अडीअडचणी दूर करा असे निर्देश दिले असल्याचे ग्रामस्थ प्रफुल घावटे यांनी सांगितले...
