महाराष्ट्र वेदभुमी

रोह्यातील इको सेन्सेटिव्ह झोन ;ग्रामस्थांचे खासदारांना निवेदन, झोन उठविण्यासाठी प्रयत्न करणार : धैर्यशील पाटील

कोलाड (श्याम लोखंडे) रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यातील 734 गावांना केंद्र सरकारकडून वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.इको सेन्सेटिव्ह झोन पडत असल्याची नोटीस त्या त्या तहसील कार्यालकडून सदरील तलाठी सज्याच्या वतीने ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत. तर दिलेल्या मसुदा नोटीसबाबत साठ दिवसाच्या आत ग्रामस्थांकडून हरकती मागविल्या आहेत. या अनुषंगाने रोहा तालुक्यातील तलाठी सजा चिल्हे हद्दीतील देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे व तळवळी या ग्रामस्थानी एकत्र येत याबाबत हरकत घेत रायगडचे कर्तव्यदक्ष्य लोकप्रिय राज्यसभा खा. धैर्यशील दादा पाटील यांना रविवारी त्यांच्या पेण येथील निवासस्थानी भेटून या हरकतीचे निवेदन दिले. यावेळी शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी,कामगार गोर गरीब जनतेचे लोकनेते खा. धैर्यशील दादा पाटील यांनी याबाबत मी सदैव शेतकऱ्यांच्या मागे ठाम आहे याबाबत पुरेपूर प्रयत्न करणार तसेच सुरू असलेल्या संसद राज्यसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणारच असल्याचे मत उपस्थित ग्रामस्थांसमवेत व्यक्त करत पूर्वी 2013/14 मध्ये गाडगीळ समितीने पर्यावरण संदर्भात दिलेला अवाहाळ आणि याबाबतची अधिसूचना काही अटी आणि काही शीतलता याची अधिक माहिती तसेच त्यानंतर पुन्हा कस्तुरी रंगनाथ समितीने काही भाग कमी करण्यात आल्या होत्या.तर संपूर्ण देशात तसेच विविध राज्यात इको सिन्स्विटी झोन संवेदनशील घोषित करण्यात येत आहे त्यामुळे याबाबतील शेतकऱ्यांनी गाफील न राहता तसेच संघटित होऊन यावर हरकती घेण्याची गरज असल्याचे सांगितले...

रोहा तालुक्यातील इको सिन्स्विटी झोन वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अधिसूचना हरकतीबाबत  चिल्हे देवकान्हे शेतकरी संघर्ष समिती च्या वतीने खा.पाटील यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते यावेळी देवकान्हे ग्राम पंचायतीचे माजी सरपंच ज्ञानेश्वेर (बाळा) भोईर,तळवली तर्फे अष्टमी मा.धनाजी लोखंडे, वसंतराव मरवडे,माजी उपरसपंच तथा विद्यमान सदस्य संदीप महाडिक, ग्रामस्थ शेतकरी तथा ज्येष्ठ नागरिक रामचंद्र मरवडे, धोंडू कचरे, सखाराम कचरे, राम महाडिक,सुरेश महाडिक, तसेच युवा शेतकरी किशोर भोईर ,संदीप लोखंडे, सुनील महाडिक, जितेंद्र खांडेकर, राम लोखंडे, तुकाराम कोंडे, पांडुरंग गोसावी, सुशील साबळे, विश्वास राऊत,शशिकांत भोईर, ज्ञानेश्वर भोईर,नंदू भोईर,आदी वरील विभागातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते...

रोहा तालुक्यातील जवळपास 119 गावांना इको सेन्सेटिव्ह झोन घोषित करण्यात येत असल्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी चिल्हे तलाठी सजा अंतर्गत देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे व तळवली ही अशी गावे आहेत कि, त्या गावापासून पर्यावरणाला हानी पोहचविण्यासारखी परिस्थिती नाही. असे असताना देखील केंद्र शासनाने या गावांची नावे घेतल्याने ग्रामस्थानी खा. धैर्यशील पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले तर यावर पुढे सदरील अधिकारी वर्गाने गांभीर्यपूर्क शेतकऱ्यांना इको सिन्स्विटी झोन वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित अधिसूनेबाबत पुरेपूर माहिती देणे गरजेचे आहे. तसेच यातील कोणत्या गोष्टी पर्यावरण पुरक आणि कोणत्या हानीकारक आहेत तसेच शेतकऱ्यांना त्यांचा आयुष्य जगण्याची रीत आहे तरी कशी इको सिन्स्विटी झोन चा राहणी माणीवर काय परिणाम दिवसेंदिवस शेतीत लागवड करण्यात येणारे बी बियाणे त्यावर मारण्यात येणारे कीटक नाशक फवारणी यावर देखील बंदी असे देखील या झोन मध्ये असेल त्याच पिकांवर परिणाम त्यामुळे इको सिन्स्विटी झोन म्हणजे सहज नेऊ नका यावर शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली पाहिजे मी जरी सत्ता पक्षात असलो तरी शेतकरी बळीराजासाठी संघर्षासाठी सदैव तत्पर असल्याचे आश्वासन देत याबाबतीत रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे साहेबांनी देखील अधिक याबाबतची स्पष्टता करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवर्जून सांगितले...

शासनाचे पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालय,भारत सरकार,नवी दिल्ली यांनी पर्यावरण संवेदनशील घोषित क्षेत्र घोषित करण्यासाठी क्र.s.O.३०६०(E) dated ३१ जुलै २०२४ अन्वये रायगड जिल्ह्यातील ७ तालुक्यातील ४३७ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात रोहा तालुक्यातील 119 गावांचा समावेश आहे. यामध्ये रोहा तालुक्यातील  तळाठी सजा चिल्हे मधील देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे व तळवली आदी गावांचा समावेश आहे. तसेच केंद्रशासनाच्या या जाचक निर्णयाविरुद्ध रायगडचे लोकप्रिय राज्यसभा खासदार धैर्यशील दादा पाटील यांना रविवारी निवेदन दिले. तसेच रोहा तहसीलदार,प्रांताधिकारी, उप वन विभागीय अधिकारी,जिल्हाधिकारी, खासदार सुनील तटकरे, माजी आमदार जयंता भाई पाटील सह सदरील आमदार यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती यावेळी उपस्थित शेतकरी ग्रामस्थानी खा. पाटील यांना या प्रसंगी दिली...

Post a Comment

Previous Post Next Post