महाराष्ट्र वेदभुमी

ग्रामपंचायत भेंडखळ उपसरपंच पदी काँग्रेसचे अजित ठाकूर!!

 


उरण प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे,) रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विश्वासू सहकारी अजित ठाकूर यांची भेंडखळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे... गणेश उत्सवाच्या एक दिवस अगोदर, दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थिती उपसरपंच पदाचा पदभार स्विकारला.अजित ठाकूर हे कॉंग्रेस पक्षाचे  तडफदार युवा नेते आहेत. रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली ते राजकीय, सामाजिक तसेच कामगार क्षेत्रात काम करत आहेत... तरुणांना नोकरीत प्राधान्य तसेच कामगारांना न्याय देण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विश्वासू सहकारी असल्यामुळे त्यांना हि जबाबदारी सोपविण्यात आली... जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...

या पदग्रहण समारंभा प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस  मिलिंद पाडगावकर, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, अल्पसंख्यांक अध्यक्ष  अखलाक शिलोत्री, रायगड जिल्हा इंटक अध्यक्ष किरीट पाटील, उरण तालुका इंटक अध्यक्ष संजय ठाकूर, जेष्ठ काँग्रेस नेते जयवंत पाटील, दिपक ठाकूर, परशुराम भोईर, महाराष्ट्र युवा इंटक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर, उरण तालुका युवा इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत, प्रमोद ठाकूर, रमेश ठाकूर, सुरेश ठाकूर, मनीष ठाकूर, साई पाटील, तुळशीदास म्हात्रे, अमोल ठाकूर, वैभव ठाकूर, विशाल कवाडे. तसेच मोठ्या संखेने कॉंग्रेस कार्यकर्ते व भेंडखळ ग्रामस्थ उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post