अलिबाग : समाजकार्य आणि राष्ट्रसेवा यांचा अनोखा संगम घडवणारा "एक धागा शौर्याचा, राखी अभिमानाची" हा प्रेरणादायी उपक्रम श्री प्रेरणा फाऊंडेशन कुसुंबळे यांच्या वतीने रोहा तालुक्यातील रा.जी.प. शाळा पिगोंडे आणि गीता द. तटकरे माध्यमिक विद्यालय पिगोंडे येथे उत्साहात साजरा करण्यात आला...
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केलेल्या राख्या आणि देशभक्तीने भारलेल्या शुभेच्छा भारतीय सीमांवर तैनात असलेल्या जवानांना पाठवण्यात आल्या... गावातील सेवानिवृत्त सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला... विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेद्वारे सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत प्रेरणादायी विचार सादर केले...
यावेळी शाळांना सामान्य ज्ञान वाढवणारे ज्ञानफलक भेट देण्यात आले... कार्यक्रमादरम्यान समाजात निस्वार्थी सेवा करणाऱ्या व्यक्तींचाही गौरव करण्यात आला... कुसुंबळे येथील तबलावादक श्री अधिकात पाटील आणि ज्योतिष्य क्षेत्रात नैपुण्य मिळवलेले श्री शैलेश जंगम (रोजा तालुका) यांचा श्री प्रेरणा फाऊंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला...
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व मार्गदर्शन श्री प्रेरणा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार अपूर्व पाटील यांनी केले... त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास यावर प्रेरणादायी मार्गदर्शन दिले...
मागील १० वर्षांपासून श्री प्रेरणा फाऊंडेशन शिक्षण, आरोग्य, सामाजिक विकास, पर्यावरण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, निर्माल्य बंदी, संगणक भेट, आदिवासी वाड्यांवर उपक्रम राबवणे, गरीब गरजूंसाठी मदत अशा विविध क्षेत्रांत सतत कार्यरत आहे...
या उपक्रमात सर्व पदाधिकारी उपाध्यक्ष सूरज कोठेकर, सदस्य रोहित पाटील, संकेत वावेकर, आदित्य पाटील, गणेश पाटील, रमेश वाघ, सामाजिक कार्यकर्ते नरेश भंडारी, पत्रकार संदेश गायकर, रोशन पाटील, दोन्ही शाळांचे शिक्षक, पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती...
देशभक्तीची नाळ मजबूत करणारा हा उपक्रम, पुढील पिढीला आदर्श घालून देणारा ठरला!
