शहानवाज मुकादम/रोहा
रायगड जिल्ह्यातला एक क्रियाशील पत्रकार काळाच्या पडद्याआड
रोहा : गेल्या २५ वर्षांपेक्षा अधिक काळ रायगड जिल्हतील पत्रकारीतेत सक्रियपणे काम करणारे तसेच मुरूड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार किरण पितांबर बाथम यांचे सोमवारी १८ ऑगस्ट रोजी सकाळी दुःखद निधन झाले. त्यांनी अनेक वर्षे दैनिक रत्नागिरी टाइम्स रायगड आवृत्तीमध्ये काम केले... त्याच बरोबर अधिक काही विविध वृत्तपत्रात स्थानिक प्रश्नांवर लोकप्रतिनिधींना हलवून टाकणारे लिखाण हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण ठरत होते... रायगड जिल्ह्यातील बहुतांश राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते... त्यांनी अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये देखील काम केले... रायगड जिल्ह्यातला एक क्रियाशील पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याचा धक्का अनेक पत्रकारांना बसला आहे... रायगड जिल्ह्यातील मुरुड हे त्यांचे गाव मात्र त्यांनी अलिबाग आणि पनवेल हे आपले कार्यक्षेत्र निवडले... किरण बाथम हे साईभक्त होते... पनवेलच्या साईदरबारात त्यांचे कायम जाणे येणे असायचे... स्वच्छ प्रतिमा जपण्याचे काम त्यांनी अखेरपर्यंत केले.तर त्यांच्या निधनामुळे मुरूड तालुका पत्रकार संघावर दुःखाचे डोंगर पसरले आहे.
