महाराष्ट्र वेदभुमी

बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधुंचा सुपडा साफ


पत्रकार मयुर पालवणकर : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल समोर आला. या निवडणुकीत फारशा चर्चेत नसलेले शशांकराव पॅनेलने कमाल करुन दाखवली. बेस्ट पतपेढीच्या एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. यामध्ये शशांकराव पॅनलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झाले. तर प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या (महायुती) सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले. या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील 9 वर्षांची सत्ता गमावली आहे. ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता न आल्याने शिवसेना आणि मनसेची चिंता वाढली आहे..

Post a Comment

Previous Post Next Post