पत्रकार मयुर पालवणकर : मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढीवर शिवसेनेचा (ठाकरे गट) झेंडा फडकला आहे. याबाबत एक्सवर पोस्ट करण्यात आलीय. स्थानीय लोकाधिकार समितीने 15 पैकी 11 जागांवर दणदणीत विजय मिळवला, असे ठाकरे गटाने ट्वीटमध्ये म्हटले आहे. दुसरीकडे बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंनी बाजी मारली अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. याबाबत अजून अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी उत्कर्ष पॅनल या निवडणुकीत उभा केला होता. तर भाजपने सहकार समृद्धी पॅनलच्या नावाने निवडणूक लढवली होती...
