कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी
चाणजे -: दि.०२ : उरण मधील चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमिकेकडे जाणारामार्ग अफकॉन कंपनीने कोणतेही पूर्व कल्पना सूचना नदेता उकडून टाकल्यामुळे गावकर्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.भर पावसात चिखलात रस्त्यातून जाताना अत्यंत संवेदनशील प्रसंगासाठी ग्रामस्थांनची वाट अत्यंत बिकट झाली आहे.त्यामुळे ग्रामस्थ क्रोधीत झाले असून, त्यांच्या मनात अफकॉन कंपनीच्या बद्दल प्रचंड राग निर्माण झालेला आहे.अफकॉन कंपनीच्या माध्यमातून रेवस करंजा सागरी पुलाचे काम सुरू आहे... या कामासाठी चाणजे गावाच्या समुद्रकिनाऱ्या लगत असलेल्या स्मशानभूमिकडे जाणारा मुख्य मार्ग उखण्यात आलाय.विशेष म्हणजे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, कोळी बांधव, यांना कोणती पूर्व कल्पना नदेता हा निर्णय घेतल्याने करंजापाडा, नवापाडा, आणि सातघरपाडा ,येथील ग्रामस्ता मध्ये नाराजीचे वातावरण आहे... रविवारी चाणजे गावातील रहिवाशी जगदीश म्हात्रे यांच्या अंत्यविधीसाठी ग्रामस्थांना चिखलातून जावे लागले... या सर्व प्रक्रियेत नातेवाईक, ग्रामस्थ, यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले... मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे, ग्रामस्थ हैराण झाले आहेत. हम करे सो कायदा या वृत्तीप्रमाणे अफकॉन कंपनीने, मनमानी प्रमाणे काम करत आहे.ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, आम्हाला पूर्वीसारखा रस्ता मिळावा, हीच आमची प्रमुख मागणी आहे...
