महाराष्ट्र वेदभुमी

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ: एक सामाजिक परिवर्तनाची चळवळ


कांतीलाल पाटील :महाराष्ट्र वेदभूमी

समाजातील विविध गटांमध्ये परस्परसंबंध प्रस्थापित करत विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी निर्माण होणाऱ्या संघटनांमध्ये राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ हे एक प्रभावी उदाहरण आहे... समाजातील भिन्न विचार, धर्म, व्यवसाय असलेले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून सामूहिक प्रयत्नांसाठी एकत्र आले की, एक ऐतिहासिक परिवर्तन शक्य होते. हीच विचारसरणी घेऊन महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानी मुंबई जवळील पनवेल येथे ५ मे २०१७ रोजी काही ध्येयवेड्या पत्रकारांनी एकत्र येऊन या संघटनेची पायाभरणी केली...

संस्थापक अध्यक्ष श्री. विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात या संघटनेने आपल्या कार्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर केला... सुरुवातीस पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारा संघ, आज समाजातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेला एक सेवाभावी व परिणामकारक संघटन म्हणून ओळखला जातो...

नेतृत्व, निष्ठा आणि व्यवस्थापन – संघटनेचा त्रिसूत्री पाया

एक यशस्वी संघटना निर्माण करण्यासाठी केवळ नेतृत्व पुरेसे नसते, तर कार्यक्षम व्यवस्थापन आणि कार्यकर्त्यांची निष्ठा देखील अत्यावश्यक असते. पुरोगामी पत्रकार संघ या तिन्ही अंगांनी समृद्ध आहे... सामाजिक कार्य, विद्यार्थ्यांचे प्रश्न, आरोग्य सेवा, महिला आणि बेरोजगार तरुणांसाठी उपक्रम, गरिबांसाठी अन्न-वस्त्र वितरण, ग्रामविकास समित्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्याचे कार्य ,अशा अनेक क्षेत्रांत संघ प्रभावी कार्य करीत आहे...

पत्रकारांसाठीचा खंबीर आधार

पत्रकारितेतील स्वातंत्र्य आणि नीतिमत्ता जपण्याच्या लढ्यांत पुरोगामी पत्रकार संघ नेहमीच पुढे आहे. पत्रकारांच्या पेन्शन, गृहनिर्माण, आरोग्य सेवा, आणि न्यायालयीन संघर्षात संघाने ठोस भूमिका घेतली. सात प्रकारच्या दबावांवर मात करत पत्रकारांना त्यांच्या भूमिकेसाठी संघ सदैव प्रेरणा देत आला आहे...

 राजकारण नव्हे – समाजकारण "

हा संघ राजकारण करत नाही किंवा त्यात भाग घेत नाही. त्याऐवजी पाणी, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांसाठी शासन प्रशासनाशी संपर्क साधून ते सोडवण्याचा प्रयत्न सतत करीत असतो. विविध सामाजिक प्रश्नांवर भव्य स्वरूपात आंदोलने उभारण्याची क्षमता असणाऱ्या या संघटनेने अनेक लोकांना दिलासा दिला आहे.. 

 राष्ट्रव्यापी विस्तार आणि वर्धापनदिन

आज पुरोगामी पत्रकार संघ केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून गुजरात तेलंगणा कर्नाटक मध्यप्रदेश या राष्ट्रीय स्तरावरही सामाजिक कार्यासाठी सज्ज झाला आहे. यंदा संघाचा आठवा  वर्धापन दिन बुलढाणा जिल्हा येथे आयोजित करण्यात आला असून, देशभरातील मान्यवर पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत...

 वैशिष्ट्ये..

गावपातळीवर कार्यरत सामाजिक परिवर्तनकारी संघ.

नव्यांना संधी व सन्मान देणारी कार्यपद्धती.

राज्यभर एकत्रित आंदोलन करण्याची ताकद.

पत्रकारांसाठी न्यायाच्या लढ्यांमध्ये सातत्याने सक्रिय.

समाजाच्या प्रत्येक घटकासाठी सेवा व उपक्रम.-

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ हा एकमेव व्यासपीठ आहे जे तळागाळातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला आणि श्रमिक वर्गासाठी न्याय मिळवून देण्यास वचनबद्ध आहे... हा केवळ संघ नव्हे तर एक चळवळ आहे – परिवर्तनाची, प्रगतीची आणि सामाजिक बांधिलकीची!

Post a Comment

Previous Post Next Post