महाराष्ट्र वेदभुमी

गोवे गावाच्या रस्त्यावर अवजड वाहने ;बंदी घालण्यासाठी ग्रामपंचायतीचे कोलाड पोलिस ठाण्यात निवेदन


पुगांव रोहा(नंदकुमार कळमकर): मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील पुई नाका येथून गोवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत उभी असणारी मोठी अवजड वाहने (कंटेनर) विनाकारण थांबली असतात...यामुळे गोवे गावाकडे येजा करणारी वाहनांना अडचण होत आहे... यामुळे या मार्गानी येजा करणाऱ्या प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.. यामुळे या रस्त्याच्या कडेला विनाकारण उभी असणारी अवजड वाहने यांना उभे राहण्यास बंदी घालण्यासाठी गोवे ग्रामपंचायतीतर्फे सरपंच महेंद्र पोटफोडे यांनी कोलाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन मोहिते यांना निवेदन देण्यात आले...

    मुंबई-गोवा महामार्गांवरील पुई नाका कॉलनीच्या एका बाजूच्या मुंबईकडून कोलाडकडे जाणाऱ्या चौपदरीकरणाच्या रस्त्याचे काम सुरु केले आहे... यामुळे महिसदरा नदीवरील नवीन बांधण्यात आलेल्या पुलावरून येणारी जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे... परंतु पुई पेट्रोल पंपासमोर याच रस्त्याच्या बाजूला विनाकारण अवजड वाहने उभी केली जातात यामुळे गोवे गावाकडून महामार्गांवरून कोलाडकडे जाणाऱ्या वाहन चालकांना रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या अवजड वाहनामुळे कोलाड बाजुकडून मुंबई बाजूकडून जाणारी वाहने दिसत नाही...यामुळे गोवे गावाकडून कोलाडकडे जाणाऱ्या प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे...यामुळे मोठा अपघात घडण्याच्या अगोदर रस्त्याच्या कडेला विनाकारण उभी असणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यासाठी  आपल्या स्तरावरून संबंधित वाहन चालकांस गँरेज व इतर दुकानदार यांना समज देऊन रस्त्याच्या खाली गाड्या पार्किंग करण्यात सूचित करावा असे निवेदन कोलाड पोलिस ठाण्यात देण्यात आला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post