महाराष्ट्र वेदभुमी

रोहा भट नर्सिंग होमकडून गोविंदासाठी मोफत उपचार,

 

कोलाड (श्याम लोखंडे): गोविंदा आणि गोपाळा चला रे दादांनो हंडी फोडायला.उत्सव आहे गोविंदाचा सण आहे आनंदाचा भारतीय संस्कृतील आंददायी सण गोविंदा म्हटले की, मानवी मनोऱ्याचे थरावर थर रचताना गोविंदाची पडझड होते... त्यामध्ये गोविंदांना छोठ्या मोठ्या दुखापती होतात. तर जखमी गोविंदांना तत्काळ उपचार मिळणे, आवश्यक असते... त्यातून गोविंदाचा जीव वाचतो हे हेरून येत्या १६ ऑगस्ट रोजी साजरा होत असलेल्या गोकुळाष्टमी सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे... व त्यासाठी रोहा शहरात दही हंडीचा सराव चालू आहे. दुर्दैवाने अनेक वेळा सराव करताना किंवा मुख्य सणाच्या दिवशी प्रसंगी अपघात होतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बाळ गोपाल गोविंदाला ईजा होतात... तर काही वेळा ह्या ईजा अतिशय किरकोळ असतात. पण काही वेळा गंभीर दुखापत झालेल्या घटना देखील नखळत घडत असतात. यासाठी रोहा येथील प्रख्यात डॉ. भट नर्सिंग होमचे डॉक्टर अपूर्व भट यांनी सेवाभाव वृतीने समस्त रोहेकर गोविंद पथकास याही वर्षी आवाहन करण्यात येत आहे...

आनंदोत्सवात गोविंदा पथकाला कोणालाही गोविंदाचा सराव करताना किंवा गोकुळाष्टमीच्या दिवशी काही जखम/दुखापत / अपघात झाल्यास प्राथमिक उपचार रोहा येथील प्रख्यात डॉ भट नर्सिंग हॉस्पिटलमध्ये तसेच डॉ अपूर्व भट यांच्या वतीने विनामूल्य करून मिळतील तर काही गंभीर दुखापती असल्यास किंवा काही ऑपरेशनची गरज लागल्यास अतिशय माफक दरात सगळे उपचार करून देण्यात येतील...

गेल्या वर्षीही डॉ भट नर्सिंग होम यांच्या तर्फे हीच योजना राबवली होती आणि आपल्या सहकार्याने अनेक गोविंदांवर यशस्वी उपचार किरकोळ दुखापत बाळ गोपाल गोविंदा यांना करण्यात आले.याच अनुषंगाने यंदाही रोहेकरांच्या सहकार्याने आपण गोकुळाष्टमीचा सण अत्यंत सुरक्षितपणे साजरा करण्यात यावा अशा शुभेच्छा डॉ.अपूर्वभट यांनी व्यक्त करत १६ ऑगस्ट रोजी, आपल्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध असलेली डॉक्टरांची अनुभवी टीम सेवेसी तत्पर आहे...सर्जनः डॉ. अपूर्व भट (MBBS, MS General Surgery) क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट: डॉ. तुषार राजपूत (MBBS, DNB Anesthesia) ऑर्थोपेडिक सर्जनः डॉ. अभिषेक रापते (MBBS, D Orthopedics)मेडिकल ऑफिसरः डॉ. अभिजीत जोशी (BHMS)

तसेच येत्या १६ ऑगस्ट रोजी सर्व एक्सरे विनामूल्य असतील...तरी आपण फक्त सुरक्षिततेचे नियम पाळा आणि उत्साहात गोविंदा उत्सव सण साजरा करा! आम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे डॉ. अपूर्व भट यांनी सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post