महाराष्ट्र वेदभुमी

'श्रावण सप्ताह' दिंडी नगरप्रदक्षिणेने संगीतमय गाथा पारायणाची सांगता

रोहा प्रतिनिधी : श्रीक्षेत्र तळवली गावात १०० वर्षाची परंपरा असलेल्या श्रावण सप्ताहाच्या अनुषंगाने कोरोना महामारीमुळे सदर सप्ताहात बदल करून संगीतमय गाथा पारायण प्रथम वर्षी शासनाने कोरोना मुळे घातलेल्या अटीचे पालन करुन संपन्न झाला... पुढील वर्षी साधकांना आवड निर्माण झाली.. आणि आजच्या घडीला ५ वे वर्ष संपन्न होत आहे... यावेळी ३० वाचकांनी लाभ घेतला... दि. ७/८/२०२५ ते १६/८/२०२५ याप्रमाणे आज आनंदाने दिंडी नगरप्रदक्षिणेने संगीतमय गाथा पारायणाची सांगता झाली... श्री विठ्ठलाचा कृपाप्रसाद आणि  सदगुरू हरिश्चंद्र महाराजांच्या आशिर्वादाने सदर कार्यक्रम विना व्यत्यय आनंदी उत्साही वातावरणात संपन्न झाला...  यासाठी आपला सेवक नंदु तेलंगे तळवली रोहा याचा सद्गुरु चरणी विनम्र माथा..

Post a Comment

Previous Post Next Post