महाराष्ट्र वेदभुमी

मुरुड बाजारपेठेत महिलांच्या दहीहंडीचा थरार ....

 

श्री काळभैरव अश्वारुढ मुर्तीची १५० हून अधिक वर्षाची परंपरा 

मानाची दहीहंडी श्री काळभैरव गोविंद पथकाने फोडली ....

प्रतिनिधी :- सत्यप्रसाद आडाव चणेरा : मुरुड तालुक्यातील कित्ते भंडारी समाजाच्या वतीने श्री काळभैरव मंदिरात भव्य अश्वारूढ मुर्तीची प्रतिष्ठापना दर वर्षी करण्यात येते. मुरुड भंडारवाडा येथील श्री काळभैरव मंदिरात गेली दिडशे वर्षांहून अधिक काळ ही परंपरा भंडारी समाज बांधव जोपासत आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सात दिवस आधी या मुर्तीची स्थापना करण्यात येते. व दहीहंडीच्या दिवशी सर्व हंड्या फोडल्यानंतर रात्री विसर्जन करण्यात येते...

       मुरुडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर शाखेतर्फे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मुरुड बाजारपेठेत गेली पंधरा वर्षे खास महिलांसाठी मानाची दहीहंडी बांधण्यात येते. ही दहीहंडी यंदाही श्रीकाळभैरव गोविंदा पथकाने फोडून ट्रॉफी मिळविल्या बद्दल मानाचा चषक देण्यात आला...

       श्री कालभैरव भंडारी महिला गोविंदा पथकांची स्थापना १७ वर्षांपूर्वी करण्यात आली. या गोविंदा पथकाचे संस्थापक माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी केली. पूर्वी भंडारवाडा मर्यादित हा गोविंदा पथक होता. आता मात्र मुरुड मधील सर्व जातीच्या महिला यात सहभागी होतात. या महिलांचा उत्साह पाहून गेले पंधरा वर्षापासून शिवसेनेच्या वतीने मुरुड बाजारपेठेतील दहीहंडीचे आयोजन तालुका संघटक कुणाल सतविडकर हे‌ करत आले आहेत. गेली दहा वर्ष महिला गोविंदा पथक ही दहीहंडी फोडून ट्राॅफी मिळवित आहेत. गोविंदा महिला पथकासाठी प्रशिक्षक समीर सुर्वे हे मेहनत घेत आहेत. या गोविंदा पथकासाठी भंडारी समाजाचे मोठे सहकार्य लाभले. यावेळी भंडारी समाज बांधव व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post