मुबंई प्रतिनीधी (सतिश वि.पाटील)
भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथील छत्रपती शिवाजीमहाराज भेट देण्याचे निमंत्रण व भिवंडीतील रस्त्याची रखडलेली कामे पूर्ण करून जनतेला दिलासा मिळावा म्हणून निवेदन दिले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दिल्ली येथील भेटीत शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजाभाऊ चौधरी यांनी दिले ...
भिवंडी लोकसभा खासदार सुरेश म्हात्रे (बाळयामामा ) यांच्या माध्यमातून दिल्ली येथील निवासस्थानी नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली...
या वेळी संस्थेचे विश्वस्त पदाधिकारी कैलास महाराज निचीते व संभाजी रविकांत पाटील उपस्थित होते. शिवक्रांती प्रतिष्ठान च्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.तर राजाभाऊ चौधरी यांनी संस्थेच्या शिवमंदिरासह भविष्यातील उपक्रमाची माहीती दिली.गडकरी यांनी संस्थेच्या शिवकार्याचे कौतूक करून महाराष्ट्रात शिवरायांचे (शक्तीपिठ) उभ करून महाराष्ट्राचा गौरव वाढवला अशी प्रतिक्रिया व्यक्त करून लवकरच शिवाजीमहाराज मंदिर (शक्तीपिठ ) येथे भेट देण्याचे आश्वासन दिले...
