महाराष्ट्र वेदभुमी

शेकाप आयोजित भव्य रोजगार मेळावा( उरण)

 

मुंबई प्रतिनीधी :( सतिश वि.पाटील)

शेतकरी कामगार पक्ष उरण  आयोजित  भव्य रोजगार मेळावा..! रोजगाराचे आश्वासन अनेक लोक देतात .परंतु आम्ही फक्त आश्वासन देत नाही, तर मुलांचे करिअर घडवतो..!

शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाकाराने उरण तालुक्यात एक भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. हा भव्य रोजगार मेळावा  रयत शिक्षण संस्था, वीर वाजेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, फुंडे (ता. उरण) येथे उत्साहात पार पडला...

या उपक्रमात उरण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यांनी अनेक करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या. यामुळे तरुणांना स्थिर आणि उज्वल भविष्यासाठी योग्य दिशा मिळेल . या रोजगार मेळाव्यामध्ये  रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सहभागी कंपन्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार...

अशा प्रकारचे उपक्रम तरुणांसाठी दिशा व संधी निर्माण करणारे ठरतात, हे या यशस्वी आयोजनातून स्पष्ट झाले. असे मेळावे  केवळ नोकरीच नाही, तर नवी दिशा देतात आजची संधी हातातून जाऊ देऊ नका! आत्मविश्वास, तयारी आणि सकारात्मक दृष्टिकोन घेऊन पुढे या. आणि आपले भवितव्य उज्वल करा.

 तसेच यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मा. अतुल नंदकुमार म्हात्रे साहेब (मास्टर ऑफ आर्किटेक लंडन,  खजिनदार शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र राज्य) उपस्थित होते व विशेष उपस्थिती मा. आ. बाळाराम पाटील साहेब (मा. आमदार विधान परिषद महाराष्ट्र) , ॲड. रोशन पाटील ( प्रदेशाध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य)  मा. नरेश घरत साहेब (राज्य सदस्य शेकाप महाराष्ट्र) , मा. राजेंद्र पाटील साहेब (मा. सभापती मुंबई कृषी उत्पन्न बामा. विजय प्रभाकर कडू साहेब (ता. अध्यक्ष पुरोगामी युवक संघटना उरण)जार समिती) , मा. रवी शांताराम घरत साहेब (उरण ता. चिटणीस शेकाप) , मा. रमाकांत पाटील साहेब (अध्यक्ष विधानसभा शेकाप उरण) , मा. वैशालीताई पाटील मॅडम (उरण ता. महिला आघाडी अध्यक्ष) , मा. नुतन पाटील मॅडम (महिला आघाडी अध्यक्ष विधानसभा उरण) , मा. ठक्कर सर (प्राचार्य वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे) , मा. संदीप दिघोडेकर (रायगड जिल्हा अध्यक्ष सोशल मीडिया सेल शेकाप) , आदी मान्यवर उपस्थित होते....

Post a Comment

Previous Post Next Post