महाराष्ट्र वेदभुमी

राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेचा जिल्हाधिकारी किशन जावळेंच्या उपस्थितीत शुभारंभ

 


रायगड :   जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात राजस्व सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी रायगड जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, रायगड जिल्हा महिला व बालविकास अधिकारी निर्मला कुचिक,प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे,प्रदीप सोळसकर, शेरमकर साहेब, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत, प्रकल्प कार्यालयातील अधिकारी वर्ग आणि मोठ्या संख्येने आदिवासी महिला लाभार्थी उपस्थित होत्या.यावेळी प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी आदिवासी विकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक आणि सामूहिक गटांच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली तसेच उपस्थित महिला लाभार्थ्यांना व गटांना केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना २०२५-२६ अंतर्गत विविध व्यवसाय करण्यासाठी निवड केलेल्या लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शुभ हस्ते मंजुरी आदेशाचे पत्र देण्यात आले... 

यावेळी उपस्थित महिला लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते या महिलांकडून स्थानिक जंगली पाना फुलांचे पुष्प गुच्छ देऊन उपस्थित अधिकारी वर्गाचे आभार मानले... या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व सूत्र संचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे मॅडम यांनी केले  तर आभार मारुती गायकवाड यांनी मानले...

Post a Comment

Previous Post Next Post