जागते रहो !
कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी
नवघर, दि.०४ : उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायत हद्दीत नवघर, नवघरपाडा आणि कुंडेगाव मिळून नवघर ग्रामपंचायत असून या तिन्ही गावांमध्ये आवो जावो ये गाव तुम्हारा है !! कोई भी आओ कोई भी जाओ !! अशी आवस्था झाली असून संपूर्ण रायगड जिल्हासह उरण तालुक्यातील भाडोत्र्यांचा गाव म्हणजे नवघर गाव अशी ओळख आज नवघर गावाची झाली आहे. रात्री अपरात्री भाडोत्री गावात फिरत असतात पण या भाडोत्र्यांवर कोणाचेही बंधन नाही नवघर ग्रामपंचायत तर भाडोत्री या समेस्येवर मुग गिळून गप्प असलेली पाहावयास मिळत आहे. येथील स्त्री वर्गालाही या भाडोत्र्यांचा आश्लील हावभावांचा सामना करावा लागत आहे पण भाडोत्री मालकांच्या दहशतीने गप्प राहतात आणि जर एखादा गावकरी या मोकाट रात्री अपरात्री भाडोत्री फिरताना दिसला आणि त्याला हटकले तर त्या भाडेकरूंचे रूम मालक भांडणावर उतरतात म्हणून भांडणतंटा नको म्हणून ग्रामस्थ देखील गप्प बसून हिरव्या ओट्यावर फक्त नवघर गावच्या विकासाच्या आणि सुरेक्षितेच्या गोष्टी करताना धन्यता मानतात. फक्त निवडणुका आल्या कि गावाच गावपण आठवणारे पुढा-री गावात भरपूर पाहावयास मिळतात तसेच निवडून आले कि गावक-यांना वा-यावर सोडून शहरात राहायला जाऊन तेथून गावच्या विकासाच्या शेळ्या हाकलतात पण गावातील होणा-या छोट्या मोठ्या गोष्टींकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून स्वताःची पाठ थोपटून धन्यता मानत आहेत. गावची लोकसंख्या जवळपास २ ते ३ हजार तर नवघर गावातील भाडेकरूंची लोकसंख्या गावक-यांच्या ४/५ पटीने जास्त असून ग्रापंचायतीकडे या भाडेकरूंची काहीच माहिती नाही याचे नवल येथील ग्रामस्थ करतात. नवघर गावात घराजवळील पार्किंग करून ठेवलेल्या मोटरसायकल, सायकली हे चोरटे रात्रीचा फायदा घेऊन चोरण्याचा प्रकार शनिवार दिनांक ०३/०८/२०२५ रोजी नवघर गावात झाला.गावातील मध्यभागी असणा-या घराजवळून दैनिक युवक आधारचे रायगड जिल्हा प्रतिनिधी प्रमुख एम.डी. भोईर यांच्या घराजवळून उभी असणरी मोटार सायकल (स्कुटी) MH 46 BT 1754 ही गाडी चोरून घेऊन गेले असून या बाबत उरण पोलिस स्टेशन येथे मोटारसायकल चोरीची तक्रार दाखल केली आहे नवघर ग्रामपंचायत हद्दीतील नवघर, नवघरपाडा तसेच कुंडेगावातील नागरिकांना सतर्क राहून आपल्या सायकळी, मोटारसायकली तसेच घराबाहेरील वस्तूंवर नजर ठेवा रात्र वैराची आहे ! आताचे दिवस चोरांचे आहेत !! तसेच सदर नवघर ग्रामपंचायतीच्या आष्टपैलु सदस्यांना गावातील वाढत्या भाडोत्र्यांच्या संख्येची माहीती बद्दल नवघर ग्रामपंचायतीकडे विचारणा केली तर ग्रामस्थांच्या खचकन आंगावर येऊन एकट्या दुकट्या नागरिकांवर एकप्रकारे दहशतच निर्माण करत असून येथील ग्रामस्थ यांच्या भितीने कोणीही काहीही बोलण्या तयार नाहीत फक्त ग्रामपंचायतीच्या निवडणुका आल्या कि दारोदारी मतांच्या भिका मांगायला घरादाराशी मतदारांच्या दारशी मात्र नचुकता येताना धन्यता मानणारे नवघर गावचे पुढारी ज्यांना गावाचे काहीही देणे घेणे नसणा-या पुढारांना मनापासून ग्रामस्थ धन्यवाद देतात कि श्राप देतात देव जाणे !!
