गोल्डन मॅन पंढरीशेठ फडके
कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी
गळ्यात किलोभरं सोनं, ऑडी कार आणि खिश्यात पिस्तुल घेऊन नेहमी एंट्री करणारे पंढरीनाथ फडके अर्थात पंढरी शेठ फडके... हे नाव पनवेल आणि आजबाजूच्या परिसरात प्रत्येकांना तोंडपाठ आहे... पनवेलमध्ये बैलगाडा शर्यत म्हणजेच पंढरीशेठ असं समीकरण बनलं होतं... पण या नावासोबत अनेक वाद आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीही जोडली गेली होती...
महाराष्ट्र बैलगाडा शर्यंत असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके हे मुळचे पनवेल येथील विहिघर गावातील राहणार होते... बैलगाडी शर्यतीचे ते प्रचंड शौकीन होते... पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते... त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता... 1986 पासून ते बैलगाडा शर्यतीचा नाद लागला... बैलगाडा शर्यतीतून अमाप पैसा कमावला... बैलगाडा शर्यतीमधील सर्वात जास्त शर्यत जिंकलेला आणि सर्वात नामांकित 'बादल' बैल ही त्यांच्याकडे आहे...
पंढरीनाथ फडके हे पूर्वाश्रमीचे शेकापचे नेते होते. मध्यतंरी त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्या दाखल करण्यात आला होता... त्यानंतर त्याने भाजपशी हातमिळवणी केली... मात्र, फडके आपली दहशत कायम ठेवून होते... अनेक प्रकरणामुळे ते कायम चर्चेत होते... गोल्डमॅन म्हणूनही त्यांची ओळख होती... गळ्यात सोन्याच्या चेन आणि हातात सोन्याचं कडं घालून ते बैलगाड शर्यतीत नेहमी हजर राहत होते... त्यांच्यावर 'पंढरी शेठ फडके विहिघर वाला बिनजोड छकडेवाला' या नावाने गाणंही तयार करण्यात आलं होतं... हे गाणं चांगलंच व्हायरल झालं होतं... बैलगाडा शर्यतीसाठी कोर्ट आणि इतर शासकीय दरबारी फडके यांनी पुढाकार घेतला होता...
काही वर्षांपूर्वी कल्याणमध्ये राहुल पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणात फडकेंना अटक झाली होती... काही काळ त्यांची रवानगी ही तरुंगात करण्यात आली होती... पण अलीकडेच ते जामिनावर बाहेर आले होते. जेलमधून बाहेर आल्यानंतर पंढरीनाथ फडके यांची प्रकृती खालावली होती... या परिस्थितीतही ते बैलगाडा शर्यतीत हजर राहत होते... त्यांचे समर्थक हे त्यांना अक्षरशः उचलून गाडीत बसवत होते... अखेरीस आज अल्पशा आजाराने पंढरीनाथ फडके यांना देवाज्ञा झाली...
त्यांचा निधनामुळे बैलगाडा शर्यत असोशियएशनची मोठी हानी झाली... या देव माणसाच्या कार्याला माझा सलाम
लेख – पत्रकार कांतीलाल पाटील – जासई (उरण)
