महाराष्ट्र वेदभुमी

रा.जि.प. ISO शाळा महादेववाडी येथे आषाढी एकादशीनिमित्त विशेष दिंडी चे आयोजन

अनंता म्हसकर : धाटाव रोहा

दि. ५ जुलै २०२५ रोजी रा.जि.प.ISO शाळा महादेववाडी येथे महादेवांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या पवित्र भूमिच्या आवारात अतिशय प्रसन्न अशा वातावरणात, विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होवून आषाढी एकादशीनिमित्त दिंडी उत्सव साजरा करण्यात आला...

असून पालखी संपूर्ण गावातून विठूनामाचा गजर करत फिरवण्यात आली त्या पालखीमध्ये सर्व विदयार्थी शिक्षक, केंद्रप्रमुख पालक गावकरी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पालखी दरम्यान रिंगण घालणे, फुगड्या घालने इत्यादी आनंद‌मय वातावरणात दिंडीचे आयोजन संपन्न झाले..

तसेच या उपक्रमात केंद्रप्रमुख (धाटाव केंद्र), मुख्याध्यापक-शिक्षक वृंद -महादेववाडी शाळा, व सर्व विदयार्थी, पालक, गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा व सदस्य यांनी सहभाग घेतला. तसेच पालक व गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना खाऊ देवून त्यांचे कौतुक केले. तसेच उपस्थित असलेले शालेय कमिटी  व मान्यवर 

१) श्री नारायण गायकर (केंद्रप्रमुख मुख्याध्यापक 

२) सौ. तेजस्विनी सुतार (अध्यक्षा, शाला व्यवस्थापक 

३) सौ. समिधा सुतार (सदस्य ग्रामपंचायत वाशी 

 श्री. सचिन भगत (शिक्षण तज्ञ)

 श्री. संतोष तपकिरे (शिक्षक)

 श्री. ललित लेंडी (शिक्षक )

 सौ. अश्विनी कारभारी (शिक्षिका)

 सौ. स्मिता घोरपडे (शिक्षिका )

व तसेच सर्व शिक्षक व गावातील ग्रामस्थ यांनी उत्तम असा नियोजनबद्ध प्रतिसाद देत उत्साह साजरा केला..

Post a Comment

Previous Post Next Post