महाराष्ट्र वेदभुमी

परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने घोसाळे पंचक्रोशीत शालेय साहित्य वाटप…

 प्रतिनिधी: दीप वायडेकर; रोहा रायगड 

परिवर्तन सामाजिक संस्था,रोहा रायगड यांच्या वतीने आज घोसाळे पंचक्रोशीतील अंगणवाडी ,मराठी शाळा येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले...

    एक हात मदतीचा व समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून परिवर्तन सामाजिक संस्था यांच्यावतीने घोसाळे पंचक्रोशीतील गावातील घोसाळे आदिवासी वाडी मराठी शाळा व अंगणवाडी, सुखदरवाडी,मुकटे आदिवासी अंगणवाडी,घोसाळे बौद्धवाडी, कांटि , फुगारेवाडी  अंगणवाडी व मराठी शाळा,कवळठे अंगणवाडी,घोसाळे प्राथमिक शाळा, साठलेची वाडी, गोपाळवट अंगणवाडी, कांडणे गाव शाळा, कोरखंडे - तळा येथील अंगणवाडी ,मराठी शाळा येथील मुलांना  वही,पुस्तके,पाटी,चित्रकला वही,दफ्तर,गणवेश व खाऊ चे वाटप करण्यात आले...

तसेच संस्थेच्या वतीने दहावी ,बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.  या प्रसंगी पंचक्रोशीतील ग्रामस्थ,श्री.भाकरे सर,घाग सर ,यादव सर,संस्थेचे पदाधिकारी तसेच मार्गदर्शक श्री.भगत सर  यांनी मार्गदर्शन व संस्थेच्या सामाजिक उल्लेखनीय कामगिरी बद्दल  मनोगत व्यक्त केले...

   परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने ग्रामीण भागात विविध समाजपयोगी उपक्रम राबविणे,गरजू व दुर्बल घटकांना सहाय्य करणे यासाठी परिवर्तन सामाजिक संस्था नेहमीच कटिबद्ध राहील.असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष श्री.सचिन मयेकर यांनी व्यक्त केला...

Post a Comment

Previous Post Next Post