महाराष्ट्र वेदभुमी

वाघाचा हल्ल्यात तरुण शेतकरी ठार

 


 सालई-मोकासा शिवारातील घटना

कुटुंबीयांना वन विभागाच्यावतीने १० लाख रुपयांची आर्थिक मदत

प्रतिनिधी : सचिन चौरसिया

रामटेक :- नागपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष प्रचंड वाढला आहे... यात निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे... जंगलाचा दिशेने एक बैलाच्या शोधात सालई (मोकासा) जंगलात गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला... नंतर त्याचे शरीर सालईच्या जंगलात फरफटत नेले... ही घटना शुक्रवार (दि.२५) सायंकाळी पारशिवनी वनपरीक्षेत्रात उघडकीस आली... दिनेश खंडाते (३२) असे मृत तुरुणाचे नाव असून तो हेटीखेडा गावातील रहवासी आहे...

माहितीनुसार, सावनेर तहसीलमधील हेटीखेडा गावातील रहिवासी दिनेश खंडाते (वय३२) शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेतीमध्ये काम करीत असताना त्याने आपली बैलजोडी चरण्यासाठी सोडली असता, त्या मधील एक बैल दिसेनासा झाला... बैलाचा शोध घेत हा जगलाच्या दिशेने सालई (मोकासा) जंगलात गेला, दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करीत मृतदेह हेटीखेडा शेतशिवाराच्या जंगलातून पारशिवनी वनपरीक्षेत्रातील सालई जंगतात फरकटत नेला... सायंकाळी दिनेश घरी परत न आल्याने घरातील लोकांनी व नातेवाईकांनी शोधा-शोध सुरु केली... ग्रामस्थांच्या सांगण्यावरून दिनेशला जंगलाच्या दिशेने जाताना पहिल्याचे सांगितले... पोलीस, नागरिक व वनविभागाच्या पथकाने संयुक्त शोध घेत रात्री ९ ते १० वाजता दिनेशचा मृतदेह पारशिवनी वनपरीक्षेत्राचा सालई जंगलात विद्रुप अवस्थेत आढळून आला... मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला... पुढील तपास सुरू आहे... वाघाच्या हल्ल्यात मृत्यू होणाऱ्यांच्या कुटुंबीयांना वन विभागाच्यावतीने १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली.. त्याच्या पश्चात म्हातारी आई, पत्नी व दोन मुली आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post