अलिबाग (ओमकार नागावकर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्वलंत नेतृत्व व महाराष्ट्राच्या राजकारणातील भावनिक अधिष्ठान असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी आज मातोश्रीवर जाऊन त्यांची खास भेट घेतली...
गुरूप्रती निष्ठा, नेतृत्वाप्रती नितांत श्रद्धा आणि पक्षविचाराशी असलेली बांधिलकी व्यक्त करत म्हात्रे यांनी "महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख" उद्धवजींना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या...
या भावनिक क्षणांना अजित गुरव व निष्ठावान कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली... सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक नात्याला सत्त्व देणारी ही सदिच्छा भेट पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि ऊर्जा भरून गेल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे...
