मुंबई प्रतिनीधी:(सतिश वि.पाटील): राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन विधानसभेचे कामकाज सुरु असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईल फोनवर ऑनलाइन रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ समोर आला... त्यामुळे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा नव्या वादात सापडले...
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अधिवेशनाचे कामकाज सुरु असताना ऑनलाईन रमी खेळत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला... हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी शेअर केला आणि या घटनेवरून मंत्री आणि सरकारवर तिकट शब्दात हल्लाबोल केला...
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्य गंभीर कृषी संकटाचा सामना करत असताना कृषी मंत्री असंवेदनशील असल्याचा आरोप केला...
तसेच रोहित पवार यांनी एक्सवर तो व्हिडिओ शेअर करत म्हणाले की, राज्यात असंख्य कृषी प्रश्न प्रलंबित असताना आणि दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत असतानाही, सत्तेत असलेला राष्ट्रवादी गट भाजपाशी सल्लामसलत केल्याशिवाय काहीही करू शकत नसल्याने, कृषीमंत्र्यांकडे दुसरे काहीही काम नसताना, रमी खेळण्यासाठी वेळ आहे असे दिसते,” अशी खोचक टीकाही केली...
रोहित पवार पुढे म्हणाले की, हे दिशाभूल झालेले मंत्री आणि सरकार पीक विमा, कर्जमाफी आणि आधारभूत किंमत मागणाऱ्या शेतकऱ्यांची हताश विनंती कधी ऐकतील का? महाराज, कधीतरी गरीब शेतकऱ्यांच्या शेतात या?” अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटातील आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ शेअर करताना एक्सवर सांगितले..
