महाराष्ट्र वेदभुमी

आ. रोहित पवार यांच्याविरोधात ईडीचे आरोपपत्र दाखल


महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण

कातीलाल पाटील :  महाराष्ट्र वेदभूमी 

मुंबई, दि.१२ : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासह काही जणांविरोधात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पीएमपीएल कायद्यातंर्गत मुंबईतील विशेüष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे...

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ईडीने आमदार रोहित पवार आणि इतर काही आरोपीं विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले, या आरोपपत्राची अद्याप न्यायालयाकडून दखल घेण्यात आलेली नाही.

बारामती अग्रोची ५० कोटींची संपत्ती जप्त

ईडीने काही महिन्यांपूर्वी रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती अग्रोची ५० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती...गेल्या वर्षी जानेवारी मध्ये ईडीने रोहित पवार यांच्याशी संबंधित मालमत्तावर छापे टाकले होते. यात बारामती अॅग्रोच्या मालमत्तांचाही समावेश होता. त्याचबरोबर ईडीने रोहित पवारांची चौकशीही केली होती. त्यानंतर हे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post