महाराष्ट्र वेदभुमी

पुणे येथील पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू


प्रतिनिधी मुरुड :मयूर पालवणकर

रायगड : रायगड जिल्ह्यातीलमुरुड तालुक्यातील काशीद समुद्र किनारी पुणे येथील पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे... तनिष्क मल्होत्रा (20) रा. बावधन, जि. पुणे असे बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे... या बाबत काशीद सरपंच संतोष राणे यांनी सांगितले की, सध्या पावसाळी हंगाम असल्याने हा किनारा बंद ठेवण्यात आला आहे... परंतु, काही उत्साही पर्यटक कोणालाही न जुमानता थेट समुद्रात उतरत आहेत... त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत... पावसाळी हंगाम असल्याने समुद्रात पोहण्यास जाऊ नये असे आवहन करण्यात आले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post