महाराष्ट्र वेदभुमी

कार्लेखिंड येथे अज्ञानातांकडून दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढिग,


वाहनचालक व प्रवाशांना नाक बंद करून करावा लागतो प्रवास, 

वनविभागाने कचरा टाकणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी,

सोगाव - अब्दुल सोगावकर : अलिबाग वडखळ मार्गावर निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या कार्लेखिंड येथील लहान पात्रुदेवी मंदिराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तींकडून दररोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. सदर ओला कचरा मोठ्या प्रमाणात टाकत असल्याने ते कुजल्यामुळे कुबट व घाण वास येत असतो, यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्वांनाच नाक धरून प्रवास करावा लागत आहे...

     कचऱ्यात ओल्या मच्छीची घाण, चिकनची घाण, कुजलेला फळे व भाजीपाला तसेच इतर मेलेले प्राणी याठिकाणी टाकत असल्याने ते कुजूल्या मुळे दुर्गंधी पसरून घाण वास येत असल्याने भयंकर त्रास सहन करावा लागतो आहे. सदर कचरा टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात वनविभागाने कडक कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे...

कोट : सदर ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात यापूर्वी कारवाई करण्यात आली आहे, तरीही यापुढे कोणी कचरा टाकताना आढळल्यास त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. जागृत नागरिकांनी अश्या प्रकारे कचरा टाकणाऱ्या व्यक्तींची नावे अथवा माहिती द्यावी, जेणेकरून आम्ही कारवाई करू शकू.

तुकाराम जाधव - अलिबाग वनविभाग परिमंडळ वनाधिकारी

फोटो लाईन - अलिबाग वडखळ मार्गावर कार्लेखिंड येथील रस्त्याजवळ पडलेले कचऱ्याचे ढिग,

छायाचित्र - अब्दुल सोगावक

Post a Comment

Previous Post Next Post