महाराष्ट्र वेदभुमी

विजय हटवार यांनी वृद्धाश्रमाला भेट देऊन माता भगिनीचा घेतला आशीर्वाद


प्रतिनिधी : सचिन चौरसिया

रामटेक :- आपले सर्वाचे सेवक नमो नमो मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार यांचा वाढदिवसाच्या निमित्त औचित्य साधून रामटेक तालुक्यातील मनसर येथील वृद्धाश्रमात भेट देऊन माता भगिनीचा आशीर्वाद घेतला आणि फळे व ईतर साहित्य वितरण करण्यात आले... नंतर विजय हटवार रामटेक येथील सरकारी रुग्णालयात जावून रुग्णालयातील डॉक्टर दिवस असल्याचे औचित्य साधून डॉक्टर यांचा सत्कार करण्यात आला... आणि रुग्णालयातील रुग्णांना फळे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित नमो नमो मोर्चा भारत संगठन मध्यप्रदेश अध्यक्ष श्री गुलाबजी गुलहानी व नमो नमो मोर्चा भारत महाराष्ट्र प्रदेश समन्वयक प्रभारी श्री मोहन वैरागडे, श्री संजयजी राऊत अध्यक्ष गडचिरोली, नागपूर शहर युवा अध्यक्ष प्रतीक बावनकर, मिडीया प्रभारी प्रणय गुल्हाने, रामटेक पत्रकार संघाचे व नमो नमो मोर्चा चे सदस्य श्री अनिलजी वाघमारे व ईतर पदाधिकारी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post