सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- भारतीय जनता पक्षच्या, पारशिवनी मंडळाची विस्तारित कार्यकारिणी सभा ७ जुलै रोजी साई सेलिब्रेशन हॉल येथे आयोजन करण्यात आली. या प्रसंगी रामटेक विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी मंडळ अध्यक्ष राहुलजी मेंघर यांनी कार्यकारिणीची घोषणा केली. आणि नवनियुक्त कार्यकारी अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. विस्तारित कार्यकारणी मंडळाला भाजप नेते माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाअध्यक्ष आनंदराव राऊत, प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजप नेते डॉ. राजीवजी पोतदार, विधानसभा संयोजक सुधाकरजी मेंघर, जिल्हा महामंत्री अनिलजी निधान, रिंकेशजी चवरे, जिल्हा उपाध्यक्ष संजयजी मुलमुले, राजेशजी ठाकरे, विस्तारक मनोजजी चवरे, जिल्हा मंत्री अतुलजी हजारे, रामटेक शहर अध्यक्ष रजत गजभिये, प्रकाशजी वांढे, अशोकजी कुथे, डॉ प्रमोदजी भड, मनोज गिरी, बिरेंद्र सिंग, सागर सायरे, शिवाजी चकोले, अनिताताई भड, माधुरीताई बावनकुळे, रेखाताई दुनेदार, छायाताई येरखेडे सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले..
