महाराष्ट्र वेदभुमी

आपत्ती व्यवस्थापन शिबिरात शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकतेचा संदेश

अलिबाग : रा.जि.प. शाळा पोयनाड येथे दिनांक १६ जुलै २०२५ रोजी आपत्ती व्यवस्थापन शिबिराचे आयोजन करण्यात आले... या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती काळातील तत्काळ मदत आणि प्रतिसाद याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला...

या शिबिराला रायगड भूषण पुरस्कार प्राप्त जयपाल पाटील, पोयनाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस विनोदकुमार देशमुख, पोयनाड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अनंत गिते, तसेच देवेंद्र तावडे, सौ. अर्चना चवरकर, मराठी शाळेतील सर्व शिक्षिका आणि बचत गटांच्या महिला मान्यवर उपस्थित होत्या...

कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये आपत्तीवेळी त्वरित प्रतिसाद देणाऱ्या आपत्कालीन सेवांबाबत माहिती देणे हे होते... या अनुषंगाने, आपत्तीच्या प्रसंगी '११२' या हेल्पलाईनवर फोन केल्यास पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल होतील, तसेच '१०८' वर संपर्क साधल्यास अपघाताच्या ठिकाणी त्वरित वैद्यकीय मदत पोहोचते आणि '१०२' रुग्णवाहिका सेवेच्या माध्यमातून रुग्णांना त्वरीत दवाखान्यात दाखल करता येते, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली...

कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण ठरला... उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती काळात धैर्याने आणि सूज्ञतेने वागण्याचे महत्त्व पटवून दिले... शाळा प्रशासनाने आणि सहभागी शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले...

Post a Comment

Previous Post Next Post