महाराष्ट्र वेदभुमी

बातमीची दखल, पाटबंधारे खाते खडबडून जागे झाले कोसळलेल्या पुलाच्या दुरुस्तीची काम युद्ध पातळीवर

कोलाड (श्याम लोखंडे): रोहा तालुक्यात १४ आणि १५ जुलै रोजी धो धो कोसळलेल्या मुसळधार पावसात तसेच निर्माण झालेले जणू काही ढगफुटी सदृश्य डोंगरभाग नाल्यातून वाहून आलेले पाणी त्यात उसळलेल्या कालव्याच्या पाण्यात देवकान्हे धानकान्हे हद्दीतील कालव्यावरील तसेच आदिवासी वाडी वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या कालव्यावरील नवीनच बनविण्यात आलेला साकव पूल कोसळत वाहून गेला त्यामुळे येथील ग्रामस्थ नागरिकांच्या रहदारीच्या मार्गावरीलच पूल कोसळल्याने त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते त्यांचे मार्गक्रमण बंद झाल्याने त्यांची येथील ग्रामस्थानी चिंता व्यक्त करत लवकरात लवकर यावर उपाय योजना करण्यात यावी याची बातमी दैनिक महाराष्ट्र वेदभूमीने प्रसिद्ध होताच सदरील खात्याला आली जाग आणि तात्काळ यंत्रणा उभी करून येथील कालव्यात आलेला गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करून पुलाची देखील दुरुस्तीचे काम सुट्टीचा दिवस असून देखील अधिकारी वर्गाने दखल घेत रविवारी २० जुलै रोजी सुरू झाले आहे त्यामुळे येथील ग्रामस्थ नागरिकांनी वृत्तपत्राचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले आहे...

मुसळधार पावसात कालव्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थित्यामुळे वरील हद्दील पूल गेली आठ दिवसांपूर्वी कोसळले होते त्यामुळे येथील आदिवासी बांधवांचा मेन रहदारी करण्याचा मार्गच बंद झाला होता त्यामळे त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले होते तर मार्ग बंद झाल्याने मोल मजुरीचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे ही बातमी महाराष्ट्र वेदभूमी वृत्तपत्रात रविवारी प्रसिद्ध होताच पाटबंधारे खाते खडबडून जागे झाले आणि कोसळलेल्या पुलाच्या दुरुस्तीची काम युद्ध पातळीवर सुरू करून जमा झालेला गाळ जेसिपीच्या साह्याने काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आल्याने येथील ग्रामस्थांची चिंता दूर होत असल्याने महाराष्ट्र वेदभूमी वृत्तपत्राचे आभार मानले आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post