महाराष्ट्र वेदभुमी

रायगडची हिरकणी हरपली

 


हिरा मावशी तिचे वयाचे ८५ व्या वर्षी निधन

कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी

रायगड,दि.११ : रायगड शिवभक्तांच्या हृदयात वसलेले स्वराज्याचा पवित्र गड आणि त्या गडाच्या पायथ्याशी राहणारी इतिहासाची श्वास वाटा जपणारी हिरा मावशी...तिला सर्वजन रायगडची हिरकणी म्हणून ओळखत असत...

हिराबाई औकीरकर यांचा जन्म ०१/०१/१९४० रोजी आमडोशी या गावात झाला.वयाच्या १५व्या वर्षी तिचे लग्न झाले.जवळपास ७०वर्ष ती रायगड किल्ल्याच्या हिरकणी बुरुजावर ती राहिली होती. हिरकणी बुरूजाच्या खाली एक  छोटेसे झोपडे बांधून त्या राहत होत्या...रायगड किल्ला पाहायला येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला ती दही ,ताक,चहा  द्यायची. पर्यटकावर पैसे नसले तरी ती फुकट  दही ,ताक,चहा द्यायची..

त्या पिढ्यानपिढ्या गडाची शौर्य कथा सांगत राहिल्या... त्या गडावर  भेटल्या की वाटायचं, हिरकणीच आपल्याला भेटली... त्यांच्या बोलण्यात इतिहासाची धार होती...  रायगडावर जाण्यासाठी तेव्हा चित्त दरवाजापासून पायरी मार्ग हा एकच मार्ग होता... त्यावेळी त्यांनी रायगड परिसरात देशमुखांचे हॉटेल सोडले तर इतर हॉटेल सुद्धा नव्हते...

जेव्हा गडावरती कोणीच येत नव्हतं... त्यावेळी किल्ले रायगड वर शिवभक्त ना अनेक वर्ष ताक आणि दह्याची सेवा देणाऱ्या हिरा मावशी तसेच त्यांच्या हाताच्या  खाणाऱ्या मोठ्या व्यक्ती म्हणजे बाळासाहेब पुरंदरे,गो.नि. दांडेकर, आप्पा परब,आदि नामवंत इतिहासकारांना रायगड किल्ला प्राधिकरणाचे छत्रपती संभाजीराजे यांनी हिराबाई यांच्या स्टॉलला भेट देऊन ताकाचा आस्वाद घेतला आहे...यांना मावशीनेच  जुन्या वाटा, गडावरचा मार्ग  सर्व ठिकाणे दाखवली...इंग्रजांनी सन १८१८ मध्ये  रायगड किल्ल्यावर हल्ला केला. त्याच्यानंतर १५० ते २०० वर्ष रायगड किल्ला बेअवस्थे मध्ये होता... तिथे कोणी येत नव्हते...महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांचे समाधी शोधून काढली... त्यानंतर त्यांनी तिची स्वच्छता करून, त्यांची  पूजा केली... त्यांच्यानंतर हिरा मावशी तेथे जाऊ लागल्या आणि त्यांनी तेथेच बाजूला छोटेसे दुकान टाकले... आणि  पर्यटकांची त्या सेवा करू लागल्या... आता त्या काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत... 

इतिहास सांगणारी, पर्यटकांची सेवा करणारी, रायगडची हिरकणी हिरा मावशी या देवीच्या कार्याला माझा सलाम..!

पत्रकार - कांतीलाल पाटील जासई (उरण)

Post a Comment

Previous Post Next Post