महाराष्ट्र वेदभुमी

मी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करीन..!

  

जनसेवा हीच माझ्यासाठी ईश्वर सेवा - हरिश्चंद्र कृष्णा ठाकूर (आप्पा) कावीळवाला – धुतुम

कांतीलाल पाटील :  महाराष्ट्र वेदभूमी

हरिश्चंद्र कृष्णा ठाकूर यांचा जन्म रायगड जिल्यातील उरण तालुक्यातील धुतुम या गावी झाला...मनामध्ये जनसेवा करण्याचे असल्या कारणाने त्यांनी जनसेवा हिच ईश्वर सेवा समझून आपला पुढील जीवन हे जनतेच्या सेवेसाठी अर्पण करायचे ठरवले आणि त्यांनी विनाशुल्क कावीळ सेवा शेवटपर्यत करत राहिले... अलिबाग शहर हे लांब असल्या कारणाने तेथील लोकांना कावीळ उतरण्यासाठी धुतुम यागावी येणे खूप लांब आणि त्रास दायक होते...परतू हरिश्चंद्र ठाकूर (कावीळवाला – धुतुम) यांनी जनतेला होणारा त्रास ओळखून अलिबाग वरून येणाऱ्या लोकांसाठी करंजा जेटीवर जाऊन कावीळ उतरण्याची सेवा चालू केली...तसेच घारापुरी व मुंबई च्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून घारापुरी व मुंबईच्या लोकांसाठी मोरा जेटीवर जाऊन कावीळ उतरण्याची सेवा चालू केली... कावीळ उतरण्याची सेवे मुळे त्यांना खूप शारीरिक त्रास होत होता, कावीळ उतरण्यामुळे हातांवर फोड यायचे, तरी सुद्धा सकाळी ०७:००  ते ११:०० वाजेपर्यंत धुतूम गावात तर अपंग, गरोदर स्त्रिया, वयाधीश लोक, तसेच धुतुम गांवात सकाळी कावीळ उतरायला येणे शक्य नसलेल्या लोकांच्या घरी जाऊन सेवा करत होते... श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादाने हे मी जनतेची सेवा करत आहे असे ते नेहमी म्हणायचे... त्यांच्या हातांना आराम मिळावा म्हणून फक्त एक दिवस सोमवारी ते आराम करत असत...त्यांच्या या कार्याची दखल घेत समाजाने  त्यांना विविध पुरस्काराने सन्मानीत केले.. 

त्यांना मिळालेले पुरस्कार - 

१.विष्णुदास भावे नाट्यगृह येथे जीवन गौरव पुरस्कार सन्मानित.

२.उरण पनवेल कर्नाळा भूषण पुरस्कार

३.बेलापूर दिवाळे 'स्टार भूषण' पुरस्कार

४.रायगड जिल्हा आदिवासी संघटने तर्फे सन्मानित.

५.आगरी कराडी संघटने तर्फे सन्मानित.

६.व इतर बऱ्याच पुरस्काराणे सन्मानित

ते धुतुम गावाचे सरपंच होते... सरपंच असताना जनसेवा हिच ईश्वरसेवा समजून त्यांनी धुतुम गावात सेवा सुविधा,शासना मार्फत गावात सुधारणा केली... उरण पंचायत समितीचे उपासभापती असताना माझ्या उरणचा विकास झाला पाहिजे.म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले होते...गोरगरीब जनतेला न्याय मिळावा म्हणून ते अहोरात्र झटत असत...म्हणून त्यांना सर्व जनता “ देवमाणूस “ म्हणून संबोधत असत... कावीळ उताराला आलेला माणूस त्याच्या पाया पडल्या शिवाय जात नसे... परतू काळाने अघात केला आणि या देव माणसाची प्राण ज्योत मावळली...पिढी जात जनसेवा असल्या कारणाने त्यांच्या पश्चात आता त्यांची चौथी पिढी कावीळ उतरण्याची  सेवा करत आहे.त्यांचा मुलगा श्री.दत्ता हरिश्चंद्र ठाकूर राहणार- धुतुम  हे कै. हरिश्चंद्र कृष्णा ठाकूर (आप्पा) यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन हे काम विनाशुल्क करत आहेत...

कै. हरिश्चंद्र कृष्णा ठाकूर (आप्पा) आणि त्यांचे चिरजीव श्री.दत्ता हरिश्चंद्र ठाकूर या दोन्ही देव माणसांच्या कार्याला माझा मनापासून सलाम !

लेख:- पत्रकार कांतीलाल पाटील – जासई (उरण)

Post a Comment

Previous Post Next Post