महाराष्ट्र वेदभुमी

मराठी मोर्चाला परवानगी नाकारने भोवले:

 


मुंबई प्रतिनीधी : (सतीश वि.पाटील )

मीरा-भाईंदरचे पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली, निकेत कौशिक नवे आयुक्त

मुंबई मिरा भाईंदरमध्ये मराठी आणि अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर मराठी संघटनांनी आयोजित केलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता... मराठी मनसे, शिवसेना आणि मराठी एकीकरण समिती यांच्या संयुक्त मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने राज्य सरकारवर टीकेची झोड उठली होती... या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालत पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली केली आहे...

मिरा भाईंदर येथील मराठी मोर्चाला परवानगी नाकारण्याचा निर्णय केवळ प्रशासनिक नसून, मराठी अस्मितेला दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता... त्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचे लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते...चौकशीचे आदेश दिल्यानंतर अवघ्या 24 तासांतच पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली...त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी निकेत कौशिक यांची मिरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे...

बदलीच्या आदेशात काय म्हटले आहे?

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत 9 जुलै 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशानुसार, भारतीय पोलिस सेवेतील (भा.पो.से.) दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापना करण्यात आल्या आहेत... महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 च्या कलम 22 न मधील तरतुदींनुसार हे बदल करण्यात आले आहेत... निकेत कौशिक, जे यापूर्वी अपर पोलिस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे कार्यरत होते, त्यांची आता पोलिस आयुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विरार म्हणून बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे... त्याचप्रमाणे, मधुकर पांडे, जे मिरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते, त्यांची बदली करून त्यांना अपर पोलिस महासंचालक (प्रशासन), महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post