महाराष्ट्र वेदभुमी

सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात! स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- तालुक्यातील ग्रामपंचायत नगरधन सांडपाण्याच्या उचित नियोजनात अपयशी ठरत आहे. याच्या फटका पीडित शेतकरी तसेच ग्रामस्थांना होत आहे. यामुळे नागरिकांचे नालीचा दुर्गंधीयुक्त दुषित सांडपाण्यामुळे रुग्णांचा संख्येत वाढ होत आहे. गावातील मुख्य रस्ता किल्ला रोडवर लाखो रुपये खर्चून नाली बांधण्यात आली आहे. परंतु ग्रामपंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे पाऊस आला की नालीतील दुर्गंधीयुक्त सांडपाणी मधुकर दमाहे व राजेंद्र दमाहे यांच्या घरात शिरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर सांडपाण्याच्या दूषित पाण्यापासून उद्भवणाऱ्या साथीचा आजाराचा धोका वाढलेला आहे. याबाबत वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाला तोंडी तसेच लिखित निवेदने देऊन सुद्धा अजून पर्यंत उचित सांडपाण्याचे नियोजन करण्यात आले नाही... त्यामुळे ग्रामस्थांसह पीडित त्रस्त आहे... मधुकर दमाहे या शेतकऱ्यांचे घरी १५० बोरे धान ठेवलेले होते. अवकाळी पावसामुळे त्यातील काही बोरे नालीच्या दुर्गंधीयुक्त पाण्यात ओले होऊन अंदाजे ४० हजार रुपयाचे नुकसान झाले होते. याबाबत शेतकरी मधुकर दमाहे यांनी ग्रामपंचायत कार्यालय नगरधनसह, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी नागपूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार रामटेक, खंडविकास अधिकारी रामटेक व ठाणेदार पोलीस स्टेशन रामटेक यांना याबाबत तक्रार केली... परंतु आजपावतो या समस्येचे समाधान झाले नाही. वारंवार अर्ज करूनही नालीचे सांडपाण्याचे कोणतीही उपाययोजना केली गेली नाही... सदर समस्येच्या उपाययोजनेबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येते ग्रा. पं. प्रशासनाची अशा प्रकारची वागणूक कायमची झाल्याने ग्रा. पं. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व जनप्रतिनिधी यांना अधिकार व सत्तेचा माज आला आहे असा आरोप मधुकर दमाहे यांनी केला आहे...

 सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात

नालीचे सांडपाण्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करणे ग्रामपंचायतचे कर्तव्य आहे... जेणेकरून ग्रामस्थांचा आरोग्य आणि स्वच्छतेची काळजी घेतली जाईल... नालीचा दुर्गंधीयुक्त दुषित सांडपाण्यामुळे साथीचे आजार आणि दुर्गंधी पसरू शकते... गावामध्ये सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरू नये, यासाठी सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे... परंतु ग्रामपंचायत प्रशासन नगरधनचे या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post