शहानवाज मुकादम/( रोहा ):श्रीवर्धन मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकती निशी जिल्ह्यात बळकट असुन पूर्वी एकत्रपणे काम करत असलेल्या राष्ट्रवादी पक्ष फुटी नंतर शरद पवार गट व अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले आहेत...
पक्ष फुटी नंतर सुद्धा खासदार सुनील तटकरे यांनी आपले राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्त्यांना आपल्या पाठीशी कायम ठेवले आहे...खासदार सुनील तटकरे पूर्वी आदरणीय म्हणून उल्लेख करत असलेले शरद पवार सुद्धा काही कमी नसून जिल्ह्यात पक्षाची बांधणी मजबूत नसताना सुद्धा पक्षाला आमदारकीचे तिकीट मिळवले होते...
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गट सक्रिय झाला असून जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर श्रीवर्धन मतदारसंघ अध्यक्ष निवड करण्यात आली... यामध्ये म्हसळा तालुक्यातील पांगळोली ग्रामपंचायत भ्रष्टाचार उघड करणारे डॅशिंग नेतृत्व म्हसाळा तालुका अध्यक्ष अजहर धनसे यांची निवड करण्यात आली आहे... त्यांच्या निवडीमुळे मतदार संघात नवचैतन्य निर्माण झाले असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे...
पक्ष फुटीनंतर शरद पवारांच्या मागे खंबीर उभा राहणार नेता म्हणून त्यांची ओळख आहे...म्हसळा तालुक्यात शरद पवार यांना आणण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता...
पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्णपणे व्यवस्थित पार पाडून पवार साहेब यांच्या जुन्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे अजहर धनसे यानी सांगितले...
