मालवण वार्ताहर : काही दिवसांपूर्वी मालवण येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याने कोसळला होता. निवडणुकीत मते मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घाईघाईत पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. तसेच जयदीप आपटे नावाच्या अल्पअनुभवी शिल्पकाराला काम दिल्यामुळे पुतळा उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात होते... निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या आपटे वर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही...
त्यानंतर "चुकांमधून काहीतरी चांगले होते" असे म्हणत सरकारने पुन्हा दुसरा पुतळा उभारला... काही दिवसातच नवीन पुतळ्याच्या चबुतऱ्याचा भाग खचून भगदाड पडले आहे व अनेक ठिकाणी तडे गेले आहेत...
पूर्वी अपघात घडूनही काळजी घेतली जात नाही त्यामुळे सरकारच्या हेतू बद्दल शंका उपस्थित होते... यावरून असे वाटते की, फक्त सिमेंटमध्ये जान असून चालत नाही... तर बनवणाऱ्याच्या काळजात महाराजांबद्दल इमानही असावे लागते.
