महाराष्ट्र वेदभुमी

राज्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण


शहरविकासासाठी १६ कोटी १४ लाख रुपयांची तरतूद

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- रामटेक शहरातील ऐतिहासिक ओळख लक्षात घेता शहरातील प्रमुख असणारा विविध चौकाचे व शाळा यांचे कायापालट करणार असून शहर हे अत्याधुनिक करणार आहेत. आपला शहर स्वच्छ व सुंदर व्हावं हे प्रत्येक शहरवासी यांचे एक स्वप्न आहे... आपला लोकप्रतिनिधी म्हणून हे स्वप्न पूर्ण करणं माझं आद्यकर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगाने माझे अविरतकार्य चालले, त्याचाच एक भाग म्हणून आज रामटेक शहरातील विविध ठिकाणी विकास कामाची सुरुवात करून त्याचा दिनांक १५ जून २०२५ रोजी भूमिपूजन व लोकार्पण सोहळा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते पार पडला... लवकरच हे  विकास कामे पूर्ण होऊन याचा फायदा शहरवासी यांना होणार आहे... असे प्रतिपादन ॲड आशिष जयस्वाल यांनी केले. रामटेक येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सौंदर्यीकरण, स्व. सदाशिवराव किंमतकर न.प.प्राथमिक शाळा नूतनीकरण लोकार्पण, कै.विठ्ठलराव हटवार न.प.प्राथमिक शाळा नूतनीकरण लोकार्पण, स्व. जतीराम बर्वे न.प.प्राथमिक शाळा नूतनीकरण, स्व . रामजी महाजन न.प.प्राथमिक शाळा नूतनीकरण, रामाळेश्वर मंदिर येथे विद्युत व्यवस्था, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे विद्युत व्यवस्था, अठराभुजा गणेश मंदिर येथे  विद्युत व्यवस्था, डूमरेश्वर मंदिर येथे  विद्युत व्यवस्था, तीळभांडेश्वर मंदिर येथे विद्युत व्यवस्था, माँ कुमारिका बाहुली मंदिर येथे विद्युत व्यवस्था, पापदुपेश्वर मंदिर येथे विद्युत व्यवस्था, टिळक वॉर्ड येथिल मोहन मंगल सांगोडे शाळा येथे फुटसल ग्राउंडचे लोकार्पण, किरण पॉईंट येथे विश्रामगृह बांधकाम, हांडे पेंटर ते गहू तलाव रोड पर्यंत बीटी रोडचे काम, संत गोरोबा काका चौक येथे सौंदर्यीकरण, जैन मंदिर चौक सौंदर्यीकरण, नेहरू चौक सौंदर्यीकरण, कालंका मंदिर परिसरातिल उद्यान विकसित करणे आदिसह इतर विविध विकासकांचा समावेश राहणार आहे... या विकासकामाच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी शिवसेना रामटेक तालुका प्रमुख विवेक तुरक,शिवसेना शहर प्रमुख राजेश किंमतकर, शिवसेना शहर संघटक बिकेंद्र महाजन, युवासेना उपजिल्हाप्रमुख कमलेश शरणागत, भाजपचे ग्रामीण उपाध्यक्ष संजय मुलमुले, नगरपरिषद माजी नगराध्यक्ष नलिनी चौधरी, विश्वास पाटील, माजी उपाध्यक्ष आलोक मानकर, भाजपा चे राहुल किरपान, भाजप रामटेक शहर अध्यक्ष उमेश पटले, माजी नगरसेवक सुमित कोठारी, रजत गजभिये, हिमांशु पानतावणे, विलास तांदूळकर, ज्योती पडोळे, नरेश माकडे, राधेश्याम साखरे, प्रणय सोमनाथे, राहुल शर्मा, माजी नगरसेवक विनायक सावरकर,  माजी नगरसेवक सुरेखा माकडे, लता कांबळे, उज्वला धमगाये, पद्मा ठेंगरे, वर्षा गाढवे, मेघाताई नेरूळवार, प्रियंका धमगाये, श्रद्धा इंदोरकर, सविता शेंडे, ज्योती पटले, शुभम बिसमोगरे, गजु बिसने, राहुल ठाकूर, अमोल गाडवे यांच्यासह रामटेक शहर महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post