महाराष्ट्र वेदभुमी

जम्मू काश्मीरमधील पहलगाम अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेले सुबोध पाटील पत्नीसह घरी सुखरूप पोहचले...


कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी वृत्तपत्रसेवा 

कामोठे-: दि.१४ : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात थोडक्यात बचावलेले पनवेल तालुक्यातील कामोठे येथील सुबोध पाटील आपल्या कामोठे येथील रॉयल हेरिटेज अपार्टमेंट मध्ये सुखरूप पोहोचले.पहलगाम येथील हल्ल्याचा थरार त्यांनी कथन केला...

 महाराष्ट्र वेदभूमी वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी सांगितले, आम्ही त्या दिवशी पहलगामला २२ एप्रिल २०२५ रोजी घोड्यावर बसून वर गेलो आणि आत मध्ये गेलो...  थोड्या वेळानंतर तिथे अतिरेक्या नी एन्ट्री केली... माझ्या पाठीमागून आवाज येऊ लागला... आम्ही पाठीमागे वळून पाहिले तर लोक धावू लागले आम्ही पण त्या दिशेने धावू लागलो बाहेर जाण्याचा मार्ग नव्हता, तारेचे कंपाउंड होते. लोक खाली झोपले होते... खाली बसले होते... आम्ही तिथे बसलो. तिथे एक अतिरेकी जवळ आला... म्हणाला, हिंदू कोण है वो खडे हो जाओ. आम्ही सर्व घाबरलो होतो जो कोणी बोलत होता त्याला अतिरेक्यांनी तिथेच समोरून गोळी घालत होते... आम्ही प्रत्यक्ष बघितलं आणि प्रचंड घाबरलो.हिंदू कोण है असे विचारून समोरून गोली मारत होते... मी समर्थांच्या कृपेमुळे वाचलो... गोळी माझ्या मानेला लागून गेली मी बेशुद्ध पडलो... काही तासानंतर मला शुद्ध आली... मी बघितलं, मिसेस मला कुठे दिसत नव्हती... सर्वत्र मृतदेह दिसत होते. डेड बॉडा दिसत होत्या...घोडेवाले आले त्यांनी मला पाणी दिले आणि घोडेवाले मला बोलले साहब चलो गेट के बाहर चलो...

त्यांनी मला खांद्यावर उचलून गेटच्या बाहेर आणले इथे बसवलं आणि मला त्यांनी पाणी दिले थोड्या मिनिटांनी त्यांच्या बाईक आल्या त्यांनी मला बाईकवर बसवलं आणि मला खाली घेऊन आले मला मलमपट्टी केली आणि मला त्यांनी अंबुलन्स मध्ये बसवलं तिथे मला माझी मिसेस दिसली आणि नंतर मला मोठ्या हॉस्पीटलमध्ये घेऊन गेले, तिथे माझा उपचार झाला..

Post a Comment

Previous Post Next Post