सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय नागलवाडी (वन्यजीव) द्वारा पर्यटन क्षेत्र कुँवारा भिवसेन येथे पर्यावरण दिनानिमित्त ५ जूनला ‘प्लास्टिकचा नकार, पर्यावरणाला आधार' अभियान राबविण्यात आले... यामध्ये आवळेघाट, चारगाव आणि परिसरातील महिला बचत गट, आकाशझेप फाऊंडेशन, शिवस्वराज्य बहुद्देशीय विकास निर्माण प्रा. लि. तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग नोंदवला... वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले, आकाशझेपचे सचिव साक्षोधन कडबे यांनी प्लास्टिकच्या अतिवापरामुळे होणारे भूमी प्रदूषण व मानवी जीवनावर होणारे भीषण परिणाम याविषयावर भिवसेन परिसरातील दुकानदार व पर्यटकांना मार्गदर्शन केले... कुँवारा भिवसेन देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांना देवस्थान परिसरात पसरलेले प्लास्टिकचे नियोजन करून कायम परिसर स्वच्छता राखण्याबाबत सूचना देण्यात आल्या...
यावेळी दुकानदार व पर्यटक यांचेकडे असलेल्या प्लास्टिकच्या पत्रावळ बहिष्कार करून देशी झाडांच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळ वापरण्यासाठी प्रदान करण्यात आल्या... देवस्थान परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा कृतिशील संदेश देण्यात आला... यावेळी वन अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर राऊत, अनिकेत मैंद, अभिषेक मैंद, महिला बचत गटांच्या महिला भगिनी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
