महाराष्ट्र वेदभुमी

विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याच्या कुटुंबियांना टाटा समूहाकडून एक कोटी रुपये देण्यात येणार

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या पुनर्निर्मितीसाठीदेखील टाटा समूह मदत करेल,टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची घोषणा

कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी वृत्तपत्र सेवा 

अहमदाबाद, दिनांक : १० जुन अहमदाबाद एअरपोर्टवरून निघालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI171 विमान टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही क्षणातंच हे विमान मेघानी परिसरातील नागरी वस्तीतील इमारतीवर कोसळले... 

विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानं हॉस्टेलमधील काही विद्यार्थी आणि इतर मिळून 265 जणांचा मृत्यू झाला आहे... "एअर इंडियाचे विमान ज्या ठिकाणी कोसळले, त्या ठिकाणी आपत्कालीन प्रतिसाद दल दाखल झाले असून, त्या सर्वांना आवश्यक ती मदत तातडीने करण्यात येत आहे... त्याचप्रमाणे या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना टाटा समूहाच्या वतीने प्रत्येकी एक कोटी रुपये देण्यात येतील" अशी घोषणा एअर इंडिया आणि टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी गुरुवारों विमान अपघातानंतर केली...

या अपघातातील जखमींनादेखील योग्य ते औषधोपचार आणि आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईल, असेही चंद्रशेखरन यांनी जाहीर केले आहे."मला हे कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की, अहमदाबाद येथील आंतररराष्ट्रीय विमानतळावरून लंडन येथे रवाना झालेले एअर इंडियाच्या 'एआय १७१ 'विमानाला आज अपघात झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांना मी श्रद्धांजली वाहतो, त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त करतो... या दुर्घटनेमुळे नुकसान झालेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत करण्यावर आम्ही प्राधान्याने लक्ष केंद्रित केले आहे... आम्हीआपत्कालीन प्रतिसाद दलाला यथाशक्ती सर्व मदत करत आहोत," अशी माहिती चंद्रशेखरन यांनी दिली... त्याचप्रमाणे हे विमान ज्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीला धडकले, त्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या पुनर्निर्मितीसाठीदेखील टाटा समूह मदत करेल, अशी घोषणा चंद्रशेखरन यांनी केली...

Post a Comment

Previous Post Next Post