कोलाड (श्याम लोखंडे): इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासुन पावसाने सुरुवात केली असुन हा पाऊस संपूर्ण मे महिनाभर कोसळला...यामुळे पुर्व मशागतीची कामे खोलंबळी तसेच जुन महिना सुरु झाल्यानंतरही कधी ऊन तर काही ठिकाणी जोरदार पाऊस यामुळे ९ जुनची तारीख उजाडली तरी काही ठिकाणी शेतामध्ये पाणीच पाणी झाल्यामुळे भात पेरणी करण्यासाठी विलंब होत आहे...यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त दिसत आहे...
रायगड जिल्हा हे भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते...या जिल्हातील रोहा तालुक्यातील सर्वात जास्त भात शेती केली जाते...वाढतेऔद्योगिकरणामुळे भात शेतीचे क्षेत्र कमी होत आहे.तरीही रोहा तालुक्यात पारंपारिक पद्धतीने भातशेती केली जाते.परंतु ऊन पावसाच्या खेळात भात पेरणीची कामे खोलंबली आहेत ..
दरवर्षी शेतकरी वर्ग २५ मे पासून धुळवाफची पेरणी केली जाते.व खरीप हंगामाला सुरुवात केली जाते. ही पद्धत पारंपारिक आहे... परंतु या वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासुन अवकाळी पावसाने सुरुवात केली आणि काही केल्या थांबना यामुळे कोलाड-खांब परिसरातील रब्बी हंगातील उन्हाळी भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे...तर अवकाळी पावसाने रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील ही पेरणी करता आली नाही...कारण अवकाळी पावसामुळे शेतात भरपूर पाणी साचले आहे... हे पाणी भातपेरणी साठी उपयुक्त नाही...पेरलेले बियाणे कुजून जाण्याची भीती आहे... यामुळे भात पेरणीची कामे खोलंबली आहेत...
