महाराष्ट्र वेदभुमी

बाईक स्वरांनाही केंद्र सरकारचा दणका ! १५ जुलैपासून टोल भरावा लागणार..!

 

अफवांवर विश्वास ठेवू नका - नितीन गडकरी

 कांतीलाल पाटील :  महाराष्ट्र वेदभूमी

मुंबई, दि.२६ : राष्ट्रीय महामार्गावर खासगी कारधारकांसाठी केंद्र सरकारने 'फास्टॅग टोल पास' योजना सुरु केली असून, सतत प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. फास्टॅगच्या माध्यमातून टोल भरताना वेळे तर वाचतोच, शिवाय एकत्रित पासद्वारे 200 ट्रिप्ससाठी ₹3,000 रुपये इतका सवलतीचा पर्याय निवडता येतो. या योजनेची अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्टपासून ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सुरु होणार आहे...

तथापि, गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर अशा प्रकारचे मेसेज आणि अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या की दुचाकीस्वारांना देखील फास्टॅग अनिवार्य होणार असून, 15 जुलैपर्यंत फास्टॅग न घेतल्यास ₹2,000 दंड भरावा लागणार आहे. या बातम्यांमुळे दुचाकीचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि अनेकांनी घाईघाईने फास्टॅग खरेदी करण्यास सुरुवातही केली आहे...

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने Twitter वर अधिकृत स्पष्टीकरण देत हा संभ्रम दूर केला आहे.NHAI ने स्पष्ट सांगितले आहे की सध्या दुचाकी वाहनांसाठी टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. या अफवा पूर्णतः निराधार असून, कोणत्याही विश्वासार्ह अधिकृत स्त्रोताविना अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे...

'फास्टॅग टोल पासा मूल्याच मुद्दे :

१)पास बंधनकारक नसून इच्छुकांनीच तो घ्यावा.

२)₹3,000 मध्ये 200 टोल ट्रिप्स करता येतील.

३)पास संपल्यानंतर नवीन पास घेता येईल.

४)एका वर्षात कितीही वेळा पास घेता येतो, यावर मर्यादा नाही...

सरकारचा उद्देश महामार्ग वाहतुकीत वेग व पारदर्शकता निर्माण करण्याचा आहे, मात्र त्यासाठी अफवा पसरवून नागरिकांना गोंधळात टाकणे निंदनीय आहे... प्रत्येक वाहनचालकाने फक्त अधिकृत स्त्रोतांवर विश्वास ठेवावा आणि कोणतीही शंका असल्यास NHAI कडून अधिकृत माहिती घ्यावी...

केंत्रीय मंत्री नितीन गडकरी ने कहा,” कुछ मीडिया हाऊसेस द्वारा दो पहिया (Two wheeler) वाहनों पर टोल टैक्स लगाए जाने की भ्रामक खबरें फैलाई जा रही है। ऐसा कोई निर्णय प्रस्तावित नहीं हैं। दो पहिया वाहन के टोल पर पूरी तरह से छूट जारी रहेगी। बिना सच्चाई जाने भ्रामक खबरें फैलाकर सनसनी निर्माण करना स्वस्थ पत्रकारिता के लक्षण नहीं है। मैं इसकी निंदा करता हूं।”

Post a Comment

Previous Post Next Post