महाराष्ट्र वेदभुमी

राजिप शाळेचा पहिला दिवस; शिक्षकांची कमी , विद्यार्थ्यांची गैरसोय सोडविणे राज्य शासनाची नैतिक जबाबदारी

नादुरुस्त/धोकादायक शाळेच्या ईमारतीचे स्ट्रक्चर ऑडिटची मागणी...

शहानवाज मुकादम/रोहा

रायगड: जिल्ह्यातील शाळा प्रवेशोत्सव 2025 कार्यक्रमाअंतर्गत शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी व आस्था निर्माण व्हावी यासाठी पुष्पगुच्छ, गणवेश आणि वह्या देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले...

 यावेळी राजिप सर्व शाळांतील व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष, पालकवर्ग, ग्रामपंचायत सरपंच,सदस्य ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते...

विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यासोबतच सर्व शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे, तसेच प्रत्येक शाळांच्या नादुरुस्त व धोकादायक इमारतीचा स्ट्रक्चर ऑडिट आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने संबंधित प्रशासनाकडून जाणीव पूर्वक कानाडोळा होत असल्याने राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे...

 विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके व गणवेश उपलब्ध करुन देण्यात राज्य शासन शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर खर्च करीत आहे...

 असे असले तरी काही ठराविक गावात विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना त्यांच्या बसण्याची गैरसोय व येणाऱ्या अडीअडचणी बाबत दखल घेण्यात येत नाही...

शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान देण्याच्या दृष्टीने मेहनत घेतांना दिसुन येतात,

 त्याचप्रमाणे शिक्षण विभागाकडून व राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पट संख्या नुसार शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, परंतू असे होतांना दिसत नसल्याने खाजगी शाळेत जास्तीत जास्त प्रवेश होतांना दिसत आहे, असे असले तरी रायगड जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिक्षण देत असून रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत ही खाजगी शाळे प्रमाणेच शिक्षण मिळत आहे...

 ग्रामीण व डोंगराळ भागातील गोरगरिब जनतेच्या मुलांचा शैक्षणिक दृष्टिकोनावर राज्य  शासनाकडून दुर्लक्ष न करता संबंधित विभागाकडून ही जिल्ह्यातील प्रत्येक शाळेची चौकशीअंत शिक्षकांची कमी दुर करण्याची गरज आहे...

 पालकवर्गाकडुनही आपल्या पाल्यांना खाजगी शाळेत प्रवेश करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतून नाव कमी केल्यास मुलांची पट संख्या कमी होईल व हळु हळु जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होतील...

गोरगरिब जनतेची मुले शिक्षणा पासुन वंचित राहणार नाही याचीही दखल शिक्षण विभाग आणि राज्य शासनाने घेण्याची गरज आहे...

 शाळा प्रवेशोत्सव 2025 च्या या कार्यक्रमात पहिल्या दिवसाच्या निमित्ताने पालकवर्ग, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये अनंदाच्या वातावरणात आज चा हा शाळेचा पहिल्या दिवस संपुर्ण रायगड जिल्ह्यात जल्लोषात साजरा करण्यात आला...

Post a Comment

Previous Post Next Post