शे का प चा दिलदार मनाचा कार्यकर्ता..
रोहा प्रतिनिधी नंदेश गायकर...माणसाची निवड हि त्याच्या चांगुलपणावर आणि प्रतिष्ठेवर अवलंबून असते... असाच लोकांचा कैवारी आणि दिलदार मनाचा कार्यकर्ता श्री. शंकर दिवकर यांची शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा परिषद खारगाव चिटणीस आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्वेसर्वा जयंत भाई पाटील यांच्या सहिनिशी कृपाशीर्वादाने नियुक्ती पत्र देऊन एक चांगल्या माणसाची निवड करण्यात आली, म्हणून शेकापक्षाच्या जनमानसांत आनंदाचे वातावरण आहे.... लोकमत आणि जनतेचा आशीर्वाद हे ध्येय बाळगून आपल्या क्षेत्रात जोमाने काम करणारा एक मोठा कार्यकर्ता अशी ख्याती असलेल्या माणसाला शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मोठे पद बहाल केलं हे उत्तम आहे... जयंत भाई पाटील यांच्या विश्वासाला तडा न देता आपल्या शेतकरी आणि कष्टकरी जनतेला आपल्या शेतकरी कामगार पक्षात सामील करून येत्या जिल्हा परिषद आणि स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सदैव सज्ज राहणार असल्याचे त्यांनी ग्वाही दिली आहे... त्यांना रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात राजकारणात दांडगा अनुभव आहे... म्हणून शेकापक्षाच्या श्री दिवकर यांच्या रूपाने पक्षवाढीला बळ येणार असे जणू चित्र जनमानसांत स्पष्ट दिसत आहे...