महाराष्ट्र वेदभुमी

सदावर्तेचे दात राहणार नाहीत : अविनाश जाधव

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा मोर्चा मी निघू देणार नाही : ॲड. गुणरत्न सदावर्ते

मराठीसाठी एकत्र या : राज ठाकरे

कांतीलाल पाटील :  महाराष्ट्र वेदभूमी 

मुंबई- दि.२८ : राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सुत्रीचा वापर आणि हिंदी  सक्तीला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यापासून विरोध केला आहे... मात्र, शासनाने तरीही हा निर्णय मागे घेतला नसून निर्णय लादण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता मनसेसह विरोधी पक्षातील नेत्यांनी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे... राज ठाकरे यांनी ०५ जुलै २०२५ रोजी मराठीसाठी एकत्र या, असा नारा देत सर्वपक्षीयाना आवाहन केलं आहे... त्यास, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने साद देत मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे... मात्र, राज ठाकरे  आणि उद्धव ठाकरेंचा मोर्चा मी निघू देत नाही, असे म्हणत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी इशारा दिला आहे... राज ठाकरेंनी मोर्चाची घोषणा केल्यापासूनच सदावर्तेंनी मोर्चाला विरोध दर्शवला आहे...

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा म्हणजे ठणठण गोपाला आहे... राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा मी निघू देणार नाही, अशा शब्दात गुणरत्न सदावर्ते यांनी कायदेशीर भाषेचा दाखला देत मोर्चा निघू देणार नसल्याचे म्हटले. जे नियम सर्वसामान्यांना आहेत, तेच नियम यांनाही लागू असले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांना भेटतात, यावर मला बोलायच नाही... पण, ठाकरे यांचा मोर्चा म्हणजे बाळगोपाळाचा मोर्चा आहे, हिंदी रोखणं म्हणजे मुलांचं शिक्षण खेळण्यासारखं आहे, असेही सदावर्तेंनी म्हटलं आहे... राज ठाकरे भाषेच्या आणि सांप्रदायिकतेच्या नावावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या मोर्चाच्या माध्यमातून काहीतरी घडविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे... राज ठाकरेंना मोर्चासाठी परवानगी नसून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे, अशी भूमिका सदावर्ते यांनी घेतली आहे. त्यावरुन, मनसेनंही संताप व्यक्त केला... 

सदावर्तेचे दात राहणार नाहीत : अविनाश जाधव

सदावर्ते हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे, या अगोदर सिद्धिविनायक मंदिराच्या विषयातही त्याने उडी मारली... एवढीच हिंमत असेल तर जा ना तिकडे साऊथमध्ये. तू स्वतःला एवढा ज्ञानी समजतो ना मग तिकडं जाऊन विरोध करुन दाखव. सदावर्ते ज्या पद्धतीने मराठी माणसांविरुद्ध काम करतो, याला घरातून बाहेर पडू देणार नाहीत... मी खात्रीने सांगतो याला मराठी माणूस एक दिवस जाम चोपेल... आमची भाजपला विनंती आहे की, याच्या तोंडाला पट्टी बांधावी, नाहीतर याच्या तोंडात दात नसतील, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी इशारा दिला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post