महाराष्ट्र वेदभुमी

गुजरात राज्यात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची गरुड भरारी!


लवकरच गुजरात राज्याची कार्यकरणी जाहीर करणार : विजय सूर्यवंशी

कांतीलाल पाटील :   महाराष्ट्र वेदभुमी वृत्तपत्र सेवा 

सुरत, गुजरात दि.१५ : अन्याय अत्याचार विरुद्ध लढणारी समाजसेवा करणारी, महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध असलेली संघटना म्हणजे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ. या पुरोगामी पत्रकार संघाने गरुडभरारी घेत १५ जून २०२५ रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार  संघाची बैठक सुरत उधना येथे दिंडोली काठीयावाडी ड्रीम म्युझिक हॉटेल येथे संपन्न झाले.. 

   गुजरात राज्यातील अनेक पत्रकार या बैठकीत उपस्थित होते, बैठकीत संस्थापक अध्यक्ष तसेच शिवधर्म मुख्य संपादक माननीय विजय सूर्यवंशी यांचे प्रमुख उपस्थिती, सुरत जिल्हा शरद पवार गटाचे अध्यक्ष माननीय अण्णा पाटील यांनी या बैठकीचे आयोजन केले ,या बैठकीत सुरत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माननीय हरीश भाई सूर्यवंशी विश्व हिंदू परिषदेचे कट्टर समर्थक माननीय विमलभाई पटेल यांनी उपस्थित पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना  संघात  सामील व्हा असे यावेळेस आव्हान केले, बैठकीच्या सुरुवातीला   अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली.... तसेच  संघाचे संस्थापक अध्यक्ष   विजय सूर्यवंशी अन्याय अत्याचार  निवारण समिती राज्य सचिव प्रीतम सिंग चौहान  राष्ट्रीय संपर्कप्रमुख झुंबरसिंग पाटील ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रावण पाटील  यांचे आयोजक अण्णा पाटील व विमल भाई, अरुण भाई कलाल यांच्याकडून हार पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले, त्याचप्रमाणे पुरोगामी संघाचे संपर्कप्रमुख झुंबरसिंग पाटील  यांचे पुष्पगुच्छ शाल देऊन स्वागत करण्यात आले, आयोजक अण्णा पाटील यांनी ज्याप्रमाणे आपले काम महाराष्ट्र मध्ये सुरू आहे, त्याचप्रमाणे गुजरात राज्यात संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकारी असतील असे आश्वासन दिले तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हरीश भाई  सूर्यवंशी यांनी यावेळेस बोलताना म्हणाले की आम्ही सर्व गुजरात राज्यातील पत्रकारांसोबत आहोत आणि आपली राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संपूर्ण गुजरात राज्यात वाढवण्यासाठी मी स्वतः मदत करेल तसेच विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विमल भाई पटेल यांनी देखील शूरवीरांच्या भूमि असलेले महाराष्ट्रातील संघाची वाटचाल आम्ही गुजरात राज्यामध्ये स्वागत करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा त्यांनी जयघोष केला, पुढे लवकरच गुजरात राज्यातील पत्रकारांना एकत्र बोलून त्यातील सक्रिय पत्रकारास राज्य अध्यक्ष आणि इतर पदे देऊन गुजरात  राज्यात संघाची यशस्वी वाटचाल सुरू असे आश्वासन दिले...

 या बैठकीस अनेक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते काही राजकीय मंडळी देखील उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post